कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या नोकरभरतीच्या वयोमर्यादेत 2 वर्षाची वाढ (In the background of Corona, the age limit of state government recruitment has been increased by 2 years)
मुंबई :- राज्य शासनाच्या नोकरभरतीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता नोकरभरतीच्या मर्यादेत दोन वर्षांची वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वयोमर्यादा वाढीचा निर्णय लागू राहिल, असं सांगण्यात आलं आहे. सरळसेवा भरतीच्या माध्यमातून नोकरभरती होत असते. यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्यामुळे राज्य सरकारने ७५ हजार पदांची नोकरभरतीची घोषणा केली आहे. मात्र कोरोनात दोन वर्षे गेले होते. त्यामुळे स्पर्धा परिक्षा होऊ शकली नाही. यातून अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा उलटून गेली होती. या विद्यार्थ्यांना संधी मिळणार नाही, त्यामुळे वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. ही मागणी मान्य झाली असून वयोमर्यादेत दोन वर्षे वाढ कऱण्यात आली आहे. आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३८ वर्षे वयोमर्यादा होती. ती आता ४० करण्यात आली आहे. तर मागास वर्गातील ४३ ऐवजी ४५ वयोमर्यादा असेल. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ज्या परिक्षांची जाहिरात येईल, तोपर्यंत वयोमर्यादेतील वाढ लागू राहणार राज्य शासनाच्या विविध विभागात ७५ हजार पदांच्या नोकरभरतीची घोषणा सरकारने केली होती. या नोकरभरतीसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments