धक्कादायक ! अवघ्या 2 महिन्यात देशभरात 34 वाघांचा मृत्यू, यातील 8 वाघ महाराष्ट्रातील तर चंद्रपूर जिल्ह्यातील 6 वाघांचा मृत्यू (Shocking! In just 2 months, 34 tigers died across the country, 8 tigers in Maharashtra and 6 tigers in Chandrapur district.)

Vidyanshnewslive
By -
0

धक्कादायक ! अवघ्या 2 महिन्यात देशभरात 34 वाघांचा मृत्यू, यातील 8 वाघ महाराष्ट्रातील तर चंद्रपूर जिल्ह्यातील 6 वाघांचा मृत्यू (Shocking ! In just 2 months, 34 tigers died across the country, 8 tigers in Maharashtra and 6 tigers in Chandrapur district.)

चंद्रपूर :- वाघांची संख्या वाढवण्यासाठी विविध प्रयत्न सुरू असताना गेल्या काही वर्षात वाघांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात तब्बल 34 वाघांचा मृत्यू झाला आहे. तर यातील 8 वाघ महाराष्ट्रातील असून 6 वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. मध्यप्रदेशात सर्वाधिक वाघांचा मृत्यू झाला असून वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. वाघांचे वाढते मृत्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. 2023 च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात 34 वाघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिध्द असून देश-विदेशातील पर्यटक केवळ वाघाला पाहण्यासाठी ताडोबाच्या जंगल सफारी साठी येतात मात्र चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा व्दारे दिलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)