महाकाली देवीची यात्रा 15 दिवसावर मात्र झरपट नदी अजूनही इकॉर्निया ग्रस्त (On the 15th day of Mahakali Devi's journey, however, the Jharpat river is still infested with ecornia vegetation)
चंद्रपूर :- चंद्रपूर चे आराध्य दैवत म्हणुन माता महाकालीची ओळख आहे चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं महाकाली देवी ची यात्रा भरते जवळपास ती महिनाभर सुरु असते या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा ई भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात विशेषतः नांदेड, लातूर या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक मोठ्या श्रद्धेने येतात चंद्रपुरातील जिल्हा प्रशासन यांच्या सोयीसाठी योग्य त्या सुविधा पुरविते मात्र यावर्षी महाकाली देवी ची यात्रा अवघ्या 15 दिवसावर येऊन ठेपली असतांना भाविकांचं मंदिरात जाण्यापूर्वी स्नान करण्यासाठी झरपट नदीच्या पाण्याचा वापर करतात मात्र सद्यस्थितीत झरपट नदीचं पात्र संपूर्ण इकॉर्निया ग्रस्त असून स्थानिक प्रशासनाने वेळीच दखल घेवून या नदीचं पात्र इकॉर्निया मुक्त करावं अशी मागणी चंद्रपुरातील नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाची महाकाली यात्रे संदर्भात नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली असून योग्य त्या सुविधा पुरविण्यावर दिशा निर्देश देण्यात आले आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments