भारतातील असं एक रेल्वेस्टेशन ज्यात प्रवासी तिकीट खरेदी करतात मात्र प्रवास करीत नाही, 14 वर्षानंतर सुरु झालेलं स्टेशन बंद पडू नये म्हणुन ! (A railway station in India in which passengers buy tickets but do not travel, so that the station, which was started after 14 years, should not be closed !)
वृत्तसेवा :- भारतीय रेल्वे जगातील चौथे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतातील जवळपास सर्वच भागात ट्रेन चालते. एखादे सामान घेऊन जाणे असो किंवा प्रवाशांना एका भागातून दुसऱ्या भागात जायचं असेल तर रेल्वे हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल आणि जर प्रवासच करायचा नसेल तर तिकीट खरेदी का करतात? जाणून घेऊयात हे रेल्वे स्टेशन उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे आहे. या रेल्वे स्टेशनचं नाव दयालपूर असे आहे. दयालपूर रेल्वे स्टेशन भारतातील एकमेव असं स्टेशन आहे जेथे लोक तिकीट खरेदी करतात मात्र, ट्रेनमधून प्रवास करत नाहीत. यामागचं कारण नेमकं काय आहे? दयालपूर रेल्वे स्टेशनच्या निर्मितीची प्रक्रिया 1954 मध्ये सुरू झाली होती. या रेल्वे स्टेशनच्या निर्मितीत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका महत्त्वाची होती. 1954 मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्याकडे दयालपूर रेल्वे स्टेशन निर्मितीच मागणी केली होती. त्यानंतर हे स्टेशन तयार झालं आणि तेथून ट्रेन्सची ये-जा सुरू झाली. प्रवासी सुद्धा ये-जा करु लागले. स्टेशन निर्मिती झाल्यापासून 50 वर्षांपर्यंत सर्वकाही सुरळीत सुरू होतं. मात्र, 2006 मध्ये दयालपूर रेल्वे स्टेशन हे भारतीय रेल्वेने बंद केलं होतं. हे स्टेशन बंद करताना भारतीय रेल्वेने सांगितले होते की, येथील तिकीट दर हे मानकापेक्षा कमी आहे. त्यानंतर 14 वर्षे हे रेल्वे स्टेशन बंद राहिले. त्यानंतर 2020 वर्ष आलं. खासदार, आमदार आणि स्थानिक लोकांच्या प्रयत्नानंतर हे रेल्वे स्टेशन सुरू झाले. यानंतर हे रेल्वे स्टेशन पुन्हा बंद होईल या भीतीने येथील नागरिक तिकीट खरेदी करतात. नागरिक आपल्या क्षमतेनुसार तिकीट खरेदी करत राहतात पण कुठेही प्रवास करत नाहीत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments