धावत्या राप्तीसागर एक्सप्रेसमध्ये माजरी जंक्शनजवळ धूर निघाल्यामुळे प्रवाशात खळबळ, अनेकांनी प्रवासाचा बेत टाळला (Smoke emanates from the running Raptisagar Express near Majri Junction causing panic among passengers, many avoid the journey)

Vidyanshnewslive
By -
0

धावत्या राप्तीसागर एक्सप्रेसमध्ये माजरी जंक्शनजवळ धूर निघाल्यामुळे प्रवाशात खळबळ, अनेकांनी प्रवासाचा बेत टाळला (Smoke emanates from the running Raptisagar Express near Majri Junction causing panic among passengers, many avoid the journey)

चंद्रपूर - देशाच्या प्रवासाची रक्तवाहिनी असलेल्या भारतीय रेल्वेच्या धावत्या रेल्वेमध्ये आग लागण्याच्या घटना घडत असतात. अशाच घटनेवर आधारित द बर्निंग ट्रेन नावाचा चित्रपट निघाला होता, त्या चित्रपटातील थरार प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. हाच थरार चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील माजरी जंक्शन वर कोचिवेल्ली येथुन गोरखपूरकडे जाणाऱ्या रेल्वे क्र. १२५१२ राप्तीसागर (Raptisagar express) एक्सप्रेसच्या प्रवाशांना अनुभवावा लागला. प्राप्त माहितीनुसार नुसार राप्ती सागर एक्स्प्रेसच्या एका बोगीच्या ब्रेकिंग सिस्टिममध्ये बिघाड आल्याने मोठ्या प्रमाणात धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेक प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. गाडीमधून धूर निघत असल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी माजरी जंक्शनवर तत्काळ रेल्वे थांबवली. गाडीमध्ये आग लागली असे समजून प्रवाशांनी गाडी थांबताच बोगीतून उड्या मारून पळ काढण्यास सुरुवात केली. गाडीजवळ उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनीही बोगीत पोहोचून लोकांना खाली उतरवले. कोचवेल्ली- गोरखपूर एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस चालणारी गाडी असून, बुधवारी दुपारी ही गाडी भांदक स्टेशनवर पोहचताच एका बोगीतून धूर निघत असल्याचे प्रवाश्यांना दिसून आले. बोगीला आग लागली असा अंदाज व्यक्त करत बोगीमधील प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. तोपर्यंत ही गाडी माजरी जंक्शनला पोहोचली. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी धूर पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ ट्रेन थांबवली. यावेळी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या समयसुचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली. कर्मचाऱ्यांनी वेळीच सतर्कता बाळगत बोगीच्या ब्रेकिंग सिस्टिममध्ये अग्निशमन यंत्राद्वारे स्प्रे मारून स्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही गाडी ४५ मिनिटे माजरी जंक्शनवर थांबली होती. त्यानंतर काही प्रवाशांना घेऊन गाडी पुढे रवाना झाली. मात्र शेकडो प्रवासी त्या गाडीने प्रवास न करता माजरी येथून इतर साधनांनी पुढे रवाना झाले. ट्रेनच्या ब्रेक सिस्टिममध्ये बिघाड आल्याने धूर निघण्यासारख्या घटना होत असतात. या घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)