डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी येथील उध्वस्त करणाऱ्या शासनाच्या विरोधात भव्य मोर्चा. (Grand march against the destructive regime at Dr Babasaheb Ambedkar Cultural Bhavan Ambazari.)
नागपूर :- अंबाझरी नागपूर येथील 20 एकर जमीन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी गेल्या ६० वर्षापासून आरक्षित असलेली जमीन महाविकास आघाडी सरकार आणि आताची शिंदे/भाजप सरकारने खाजगी कंपनीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विकली. खाजगी कंपनीने ताबा मिळताच ह्या आरक्षित जमिनीवरचे नागपूर महानगर पालिकेच्या मालकीचे डॉ आंबेडकर सांस्कृतिक भवन पूर्णतः उध्वस्त केले. हया अन्यायाच्या आणि दडपशाहीच्या विरुद्ध संपूर्ण आंबेडकरी समाज, दलित, मागासवर्गीय, संविधान प्रेमी नागरिक पेटून उठले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृती समितीच्या वतीने जन आंदोलन मागील 3 महिन्यापासून सुरू आहे. ह्याचाच एक भाग म्हणून दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ च्या सिव्हिल लाइन्स येथील कार्यालयावर स्मारक उध्वस्त करणाऱ्या गुंड कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध FIR दाखल करण्याचे आदेश, माननिय जिल्हाधकारी, नागपूर ह्यांचे आदेश असतानाही कां, FIR दाखल केली नाही ? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या गुन्हेगारांना पाठीशी कां घालत आहे. ह्या मागणी साठी व जाब विचाण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सर्व जागृत नागरिकांनी ह्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होवून मोर्चा यशस्वीेत केला. मोर्चाचे नेतृत्व सामूहिक होते. तरी शिष्ट मंडळ भेटायला गेले असता मा. मुख्य संयोजक किशोर गजभिये माजी सनदी अधिकारी यांच्या नेतृत्वात एम. टी. डी.सी.चे प्रमुख नागपूर विभागाचे कांबळे साहेब यांना भेटून निवेदन दिले. व त्यांना कळवण्यात आले की संबंधित विभागाचे सचिव यांचे हमीपत्र पत्र आम्हाला लेखी पाहिजे. दिवसभर आंदोलन केल्यावर सुध्दा शासन प्रशासन अधिकारी एकत नव्हते आणि आंदोलन उग्र रूप धारण करून रात्र भर ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका घेवून हे आंदोलन एम. टी. डी.सी.कार्यालयातच सुरू राहिले.आणि शासन प्रशासन अधिकारी यांना नमावे लागले लगेच रात्री 10:00 वाजता मुख्य सचिव महाराष्ट्र यांच्या फॅक्स विभागीय आयुक्त नागपूर विभाग यांच्या नावे आला आणि सात दिवसात ह्या पूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिला. व त्या नंतर आजच्या आंदोलनाची सांगता करण्यात आली.आंदोलनात आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments