चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मासेमारी करणाऱ्या वृद्धाला मासोळीच्या शेपटीचा फटका लागल्यानं मृत्यू ! (An old man who was fishing in Chimur taluka of Chandrapur district died after being hit by the tail of a fish!)
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मासेमारीसाठी गेलेल्या वृद्धाला मासोळीच्या शेपटीचा फटका लागल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे. तुकाराम कोडापे वय 70 वर्ष असं या वृद्धाचं नाव आहे. ते चिमूर तालुक्यातील सातारा येथील रहिवासी आहेत. मासेमारी करत असताना एका मोठ्या माशाने कोडापे यांच्या छातीवर जोरदार प्रहार केला, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी सातारा येथील तुकाराम कोडापे अनेक वर्षांपासून मच्छिमारी करतात. मात्र हयातभर रोजीरोटी देणाऱ्या मच्छीनेच कोडापे यांचा घात केला. कोडापे गावाशेजारी असलेल्या टेकेपार येथील मामा तलावात नेहमीप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांसोबत मासेमारीसाठी गेले होते. तुकाराम आणि त्यांचे सहकारी मासे पकडण्यासाठी तलावात उतरे मात्र यावेळी मोठ्या माशाने तुकाराम यांच्या छातीवर जोराचा प्रहार केला हा आघात त्यांना सहन न झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments