Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बामणी टी पॉइंटवर गांजाची तस्करी उघड, १७.४७५ किलो गांजासह तिघांना अटक (Local Crime Branch operation: Ganja smuggling racket busted at Bamni T-Point; three arrested with 17.475 kg of ganja.)

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बामणी टी पॉइंटवर गांजाची तस्करी उघड, १७.४७५ किलो गांजासह तिघांना अटक (Local Crime Branch operation: Ganja smuggling racket busted at Bamni T-Point; three arrested with 17.475 kg of ganja.)

बल्लारपूर :- ओडिशातून गांजा आणून त्याची अवैध विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बामणी टी पॉइंट येथे सापळा रचून अटक केली. आरोपींकडून १७.४७५ किलो गांजा, चारचाकी वाहन आणि चार मोबाईल असा एकूण १७ लाख ८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांना गुप्त बातमीदाराकडून ओडिशातून काही इसम चारचाकी वाहनाने गांजा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. हा गांजा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बल्लारपूर-राजुरा मार्गावरील बामणी टी पॉइंट येथे सापळा रचला. पोलिसांनी गांजासह चारचाकी वाहन आणि आरोपींच्या ताब्यातील वापरते चार मोबाईल असा एकूण १७ लाख ०८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (एनडीपीएस कायदा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. 
         यावेळी संशयित चारचाकी वाहन क्रमांक एमएच-२४ बीआर-९२८२ पोलिसांनी अडवून तपासणी केली. वाहनातील अमोल रमेश कांबळे ३३ वर्ष रा. एरंडी सरोडा, ता. औसा, जि. लातूर, सदानंद रविंद्र जना ३२ वर्ष व्यवसाय मजुरी, रा. साबोरिया, ता. खलीगोट, जि. गंजाम, ओडिशा आणि ओंगा बिरा कोवासी २८ वर्ष व्यवसाय मजुरी, रा. बोपनपल्ली, ता. कालीमेला, जि. मलकानगिरी, ओडिशा यांच्याकडे तपासणी केली असता १७.४७५ किलो गांजा आढळून आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दीपक काँक्रेडवार, सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा अजय बागेसर, पोहवा गणेश भोयर, पोहवा रामराव बिंगेवाड, पोहवा शरद कुडे, पोहवा रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा सचिन गुरनुले, पोहवा सुभाष गोहोकार, पोअं प्रतिक हेमके, पोअं विठ्ठल काकडे, पोअं प्रफुल पुप्पलवार, दिनेश अराडे यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या