मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक पदासाठी परिक्षा तांत्रिक कारणामुळे रद्द लवकरच नवी तारीख जाहीर करणार (The Bombay High Court's examination for the post of clerk has been cancelled due to technical reasons; a new date will be announced soon.)
मुंबई :- मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक पदाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लिपिक परीक्षेतील तांत्रिक घोळामुळे राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर संभाजीनगर येथे जाऊन सीजेपीचे नेते अभिजीत दिपके यांनी या आंदोलकांची भेट घेतली होती. त्यामुळे अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाचे हे यश म्हटले जात आहे. या परीक्षांची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या संगणक टायपिंग परीक्षेत राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन, की-बोर्ड, माऊस न चालणे आणि सिस्टीम अचानक लॉगआउट होणे अशा गंभीर तांत्रिक त्रुटी समोर आल्या होत्या.
कल्याण, छत्रपती संभाजीनगर, वाशीम आणि नांदेड यांसारख्या केंद्रांवर परीक्षा सुरू होताच काही मिनिटांतच सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे उमेदवार नापास दाखवले गेले. यामुळे संतापलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रांबाहेर तीव्र निदर्शने करीत फेर मागणी केली होती. या आंदोलकांना सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांनी भेटून संभाजीनगरात ठिय्या आंदोलन केले होते. या तांत्रिक बिघाड आणि सावळागोंधळ आणि उमेदवारांनी राज्यातील अनेक परीक्षा केंद्रावर निदर्शने केली होती. या आंदोलनाची दखल हायकोर्ट प्रशासनाने घेतली. सुरुवातीला प्रशासनाने परीक्षा सुरळीत पार पडल्याचे सांगतले होते. मात्र, तांत्रिक त्रुटींची पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन नंतर प्रशासनाने दिले होते. तांत्रिक गैरसोयीमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित परीक्षा रद्द करण्यात आली असून, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता लवकरच नवी तारीख आणि सुधारित वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या