मुख्याध्यापकच बनले देवदूत..! नेपाळच्या भयंकर महापुरात मुख्याध्यापकाच्या समयसूचकतेने वाचला १६४३ विद्यार्थ्यांचा जीव (The Headmaster Himself Became a Guardian Angel! Thanks to the Headmaster's Presence of Mind, 1,643 Students' Lives Were Saved During Nepal's Devastating Floods.)
वृत्तसेवा :- नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरात सगळंच उद्ध्वस्त झालं. मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अंदाजानुसार ७०० पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले तर अजूनही २५०० हजारहून अधिक लोक बेपत्ता आहेत. या महापुरात अनेक शाळा, कॉलेज देखील उद्धवस्त झाली आहेत. अशात एका शाळेच्या मुख्याध्यापकाच्या प्रसंगावधानामुळे १६४३ विद्यार्थ्यांचा जीव वाचला आहे. शाळेतील सर्व मुले आणि शिक्षक जवळच्या एका टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली पोहोचले. त्यांच्या डोळ्यादेखत काही क्षणात महापुराच्या पाण्यात तीन मजली शाळा वाहून गेली. या महापुराने शाळेतील एक शिक्षक आणि शिपाई यांनाही वाहून नेले. त्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. सुदैवाने या संकटात शाळेत शिक्षणासाठी आलेल्या १६४३ विद्यार्थ्यांचा जीव बचावला आहे. शाळेच्या मुख्यध्यापकांना संकट येत असल्याची चाहूल आली आणि त्यांनी तातडीने शाळेच्या विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी नेलं. त्यांना आलेल्या एका फोनमुळे हजारोहून अधिक मुलांचे प्राण वाचले.
त्रिभुवन त्रिशूली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र दवडी यांना बुधवारी सकाळी ९:२० ला त्यांच्या एका मित्राचा कॉल आला. नदीच्या महापुरात आमचे गाव वाहून गेलं आहे. तुम्ही तिथून पळा, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी त्या शाळेत १६४३ मुले ३ मजली इमारतीमध्ये होती. सुरुवातीला त्यांना शाळा सुरक्षित वाटली. कारण शाळा नदीपासून ६० मीटर उंचीवर आहे. मात्र एका पालकाने धावत येऊन सांगितले की, पाणी अत्यंत वेगाने वाढत आहे. दवंडी यांनी काहीच विचार न करता तातडीने शाळेची घंटा वाजवली. शिक्षकांना वर्ग रिकामे करण्यास सांगितले. त्यांनी शाळेच्या बस चालकांना कॉल केला, त्यांना परत जाण्यास सांगितले. एका बस चालकाशी संपर्क होऊ शकला नाही. ती बस त्या पुलावरून जातांना त्यांना दिसली. एक मुलगी घाबरल्यामुळे तिला पॅनिक अटॅक आला. तिला बाईकवरून डोंगरावर नेण्यात आले. बाकी सर्व मुले पायी वर पळाली. सर्व मुलांनी पिंपळाच्या एका झाडाखाली आश्रय घेतला. त्यांच्या डोळ्यादेखत शाळेची इमारत वाहून गेली. एक शिपाई आणि शिक्षकांशिवाय मुख्याध्यापकांनी शाळेतील १६४३ मुले आणि शिक्षकांचे जीव वाचवले. मुख्याध्यापकांच्या प्रसंगावधानामुळे मुलांचे प्राण वाचले.
संतोष पेरियार (वय ३२) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते सामाजिक इतिहासाचे शिक्षक होते. संतोष पेरियार हे नदीकाठी असलेल्या त्यांच्या भाड्याच्या खोलीत नाश्ता बनवण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते महापुरातवाहून गेले. तर शाळेचे शिपाई सुलतान लामा यांचा देखील मृत्यू झाला. सुलतान लामा हे शाळेचे दरवाजे बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते देखील महापुरात वाहून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. मुलांना वाचवल्याबद्दल स्थानिकांनी त्यांना हिरो म्हटलं, मात्र त्यांनी 'मी दुसरं काय करू शकलो असतो' असे म्हटलं. "मी आता बत्तर येथे पोहोचलो आहे. जेव्हा आम्ही शाळेतून बाहेर पडलो, तेव्हा आम्ही टेकडीच्या दिशेने धावत गेलो. तिथे जे काही उपलब्ध होईल त्याआधारे आम्ही दिवस काढले. आम्ही तिथे जवळपास अडकूनच पडलो होतो. माझ्यासोबत जवळपास ४० ते ५० कर्मचारी होते", असे दवडी यांनी सांगितले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या