Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

महात्मा फुले महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त एनसीसी विभागाच्या वतीने "आधुनिक करिअरच्या गरजांनुसार आवश्यक कौशल्यांतील बदल" या विषयावर मार्गदर्शन (Guidance session on "Shifting Skill Requirements for Modern Careers" organized by the NCC Department at Mahatma Phule College on the occasion of World Youth Skills Day.)

बल्लारपूर :- 21 महाराष्ट्र बटालियन वर्धा व महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर च्या संयुक्त विद्यमाने एनसीसी विभागाच्या वतीने जागतिक युवा कौशल्य दिवसाचे औचित्य साधून महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सैनिक विभाग द्वारे "आधुनिक करिअरच्या गरजांनुसार आवश्यक कौशल्यांतील बदल" या विषयावर डॉ. संदीप सोनोने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

           या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विनय कवाडे, डॉ. स्वप्नील बोबडे, एनसीसी विभागाचे प्रा ले. योगेश टेकाडे यांची विचारमंचावर उपस्थिती होती. "आधुनिक काळात विद्यार्थीनि आर्टिफिशिल इंटेलिजन्स AI वापराचे नवीन कौशल्य आत्मसात करावे. यासाठी महात्मा फुले महाविद्यालय बल्लारपूर सह लायड विद्यानिकेतन वर्धा, एसएसएनजी कॉलेज देवळी, लोक महाविद्यालय आष्टी या महाविद्यालयात ही 'युवा सेतू'द्वारे कौशल्य बळकटीकरणातून सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मार्गदर्शन कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी सह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या