स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ५.७५३ किलो गांजासह जप्त २ लाख ८७ हजार ६५० रुपयाचा मुद्देमाल जप्त दोन ताब्यात (Local Crime Branch operation: 5.753 kg of cannabis and contraband worth ₹2,87,650 seized; two persons taken into custody.)
चंद्रपूर :- बल्लारपूर-बामणी मार्गावर गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल ५.७५३ किलो गांजा जप्त केला. ही कारवाई ५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बल्लारपूर येथील होंडा शोरूमजवळ, जिओ सेंटरसमोर करण्यात आली. जप्त गांजाची अंदाजे किंमत २ लाख ८७ हजार ६५० रुपये आहे. या कारवाईत मंगेश संतोष उंदीरवाडे २३ वर्षे रा. सोनापूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली आणि सागर बाबुराव मरगडे १९ वर्षे रा. निमगाव, ता. पवनी, जि. भंडारा यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात गस्तीवर असताना गोपनीय माहितीदाराकडून दोघे गांजाची अवैध वाहतूक करून बल्लारपूरहून बामणीमार्गे चामोर्शीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचला. पहाटे सुमारे १.३५ वाजता माहितीदाराने दिलेल्या वर्णनाप्रमाणे दोन इसम पाठीवर लाल-काळ्या रंगाच्या बॅगा घेऊन येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी मंगेश उंदीरवाडे व सागर मरगडे अशी नावे सांगितली.
आरोपीचे झडती घेतली असता सागर मरगडे याच्या बॅगेत कपड्यां व्यतिरिक्त आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. त्याच्याकडून एक जुना विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. दरम्यान, मंगेश उंदीरवाडे याच्या बॅगेची झडती घेतली असता ब्राउन रंगाच्या पॅकिंग टेपने गुंडाळलेली दोन पार्सले आढळून आली. पार्सले उघडून पाहिल्यावर त्यामध्ये हिरवट रंगाची, उग्र वासाची गांजासदृश्य वनस्पती आढळली. प्राथमिक तपासणीतही सदर पदार्थ गांजासदृश्य असल्याचे निष्पन्न झाले. वजन केल्यानंतर पहिल्या पार्सलमधून ३.४५८ किलो, दुसऱ्या पार्सलमधून २.२६८ किलो, तर बॅगेतील छोट्या कप्प्यातून ०.०२७ किलो, असा एकूण ५.७५३ किलो गांजा जप्त करण्यात आला. यासोबतच मंगेशकडून सुमारे २० हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल आणि ३ हजार ८०० रुपये रोख जप्त करण्यात आले. असे एकूण ३ लाख ३१ हजार ९५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले,पोहवा सतीश अवथरे, इम्रान खान, लालू यादव, हिरालाल गुप्ता, संदीप कांबळी,किशोर वैरागडे, पोअं किशोर वाकाटे, शशांक बदामवार, चापोअं मिलिंद टेकाम सह सायबर सेल चे पोहवा कार्तिक खनके यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या