Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

पाली भाषेच्या संवर्धनासाठी शेवटपर्यंत लढणारा योद्धा हरपला - ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. सुधीर भगत यांचे निधन (A warrior who fought to the very end for the preservation of the Pali language is no more – Veteran Ambedkarite activist Dr. Sudhir Bhagat passes away.)

पाली भाषेच्या संवर्धनासाठी शेवटपर्यंत लढणारा योद्धा हरपला - ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. सुधीर भगत यांचे निधन (A warrior who fought to the very end for the preservation of the Pali language is no more – Veteran Ambedkarite activist Dr. Sudhir Bhagat passes away.)

नागपूर :- देशातील सर्वात प्राचीन असलेली व लोकभाषा म्हणून प्रचलित असलेली पाली भाषा ही संविधानाच्या शेड्युल्ड ८ मध्ये करण्यात यावी, या मागणीसाठी आयुष्यभर लढणारा योद्धा ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. सुधीर जनार्दन भगत यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. डॉ. भगत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यासह डॉ. भगत हे कवी, गीतकार, गायक आणि संगीतकार म्हणूनही प्रसिद्ध होते. 'ज्ञानसूर्य इस जगत का, भीमराव महान...' "युगों से शापित मानव को बदल दिया वरदानों में...""भीम के हम नौजवान, कुर्बान भीम हो जाएंगे...""जय भीम की गूंज गूंजाता चल..."" अविस्मरणीय संगीत अल्बमचे निर्माते, प्रख्यात गीतकार, कवी, लेखक, विचारवंत, गायक आणि समाजसेवक, ज्यांनी अशा अनेक प्रेरणादायी गीतांद्वारे बहुजन समाजात सांस्कृतिक जागृती आणि सामाजिक जाणीव जागृत केली, त्या आदरणीय सुधीर भगतजी यांचे निधन ही एक अत्यंत दुःखद आणि कधीही भरून न येणारी हानी आहे. आपल्या शब्दांनी, विचारांनी आणि गीतांनी त्यांनी हजारो लोकांच्या हृदयात स्वाभिमान, समानता आणि मानवतेची ज्योत प्रज्वलित केली. त्यांचे साहित्यिक आणि सांस्कृतिक योगदान नेहमीच प्रेरणा देत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली! तुमचा संघर्ष, तुमचे लेखन आणि तुमचा आवाज आमच्यात सदैव जिवंत राहील. यांसारख्या प्रेरणादायी गीतांचे ते रचनाकार होत. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. सुधीर भगत यांनी आपल्या गीतांमधून आणि सामाजिक कार्यातून हजारो कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली.ते उत्पादन शुल्क विभागात कार्यरत होते. सेवाकाळात त्यांनी न्यायालयात संविधानाची शपथ घेऊन साक्ष देत नवा संविधानिक पायंडा पाडल्याची नोंद त्यांच्या कार्यातील महत्त्वपूर्ण बाब मानली जाते. मागील काही वर्षांपासून ते आजाराशी झुंज देत होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यातही त्यांनी सामाजिक कार्याचा ध्यास सोडला नाही. विशेषतः पाली भाषेला संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी त्यांनी अखेरपर्यंत सातत्याने प्रयत्न केले. या विषयावर त्यांनी विविध स्तरांवर पाठपुरावा केला होता. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्यांच्या कार्याची व्यापक दखल घेण्यात आली. २१ जूनला सामूहिक शोकसभा दिवंगत डॉ. सुधीर भगत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध सामाजिक संघटनांच्या वतीने येत्या २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजता सीताबर्डी येथील हिंदी मोरभवन येथे सामूहिक शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या