Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूरात दोन विविध घटनेत तीन तलवारी व दुचाकीसह पाच जण ताब्यात (Five individuals detained along with three swords and a two-wheeler in two separate incidents in Ballarpur.)

बल्लारपूरात दोन विविध घटनेत तीन तलवारी व दुचाकीसह पाच जण ताब्यात (Five individuals detained along with three swords and a two-wheeler in two separate incidents in Ballarpur.)

बल्लारपूर :- शहरात लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवारी बाळगून फिरणाऱ्या तरुणांविरुद्ध बल्लारपूर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत तीन लोखंडी तलवारी आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली असून आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कारवाई ९ जून रोजी करण्यात आले. पहिली कारवाई गणपती विसर्जन घाट परिसरात करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काही युवक काळ्या रंगाच्या दुचाकीवर फिरत तलवारींच्या जोरावर परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली होती. 
          ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये कृष्णा संग्राम बहुरिया (१८), कार्तिक विनोद माहेश्वरी (१८) दोन्ही रा. सरदार पटेल वॉर्ड आणि रोहित राजा बहुरिया (१८), रा. आंबेडकर वॉर्ड बल्लारपूर यांचा समावेश आहे. झडती दरम्यान कृष्णा व कार्तिक यांच्या ताब्यातून दोन लोखंडी तलवारी तर रोहितच्या ताब्यातील काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून सुमारे ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, त्याच दिवशी छठ पूजा घाट वस्ती परिसरातही अशाच प्रकारची दुसरी कारवाई करण्यात आली. येथे तलवार बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सन्नी सुरेश मंथनवार (१९) रा. आंबेडकर वॉर्ड याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने एका भिंतीमागे लपवून ठेवलेली लोखंडी तलवार काढून दिली. या प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही घटनांमध्ये आरोपींकडून धारदार शस्त्रे बाळगून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून त्यांच्याविरुद्ध कलम ४ व २५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड सह गुन्हे शाखेच्या पथकाने केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या