धार्मिक श्रद्धेतुन अंघोळीला गेलेला व्यक्ती वर्धा नदीत बुडाला तर बेपत्ता युवकांचा मृतदेहही आढळला (A person who had gone for a ritual bath out of religious faith drowned in the Wardha River, and the body of a missing youth was also found.)
बल्लारपूर शहरातील श्रीराम वॉर्ड येथील दिपेश विनोद कलकोटवार (वय ३२) हा युवक मंगळवारी रात्री सुमारे ९ ते ९.३० वाजताच्या दरम्यान घरून स्कूटी घेऊन बाहेर पडला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्याने वर्धा नदीत उडी मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. चंद्रपूर येथील बचाव पथक व स्थानिक पोहणाऱ्यांकडून शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर बुधवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास सास्ती पुलाखाली दिपेश कलकोटवार यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह आढळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अल्पावधीत घडलेल्या या दोन दुःखद घटनांमुळे बल्लारपूर व सास्ती परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या