चांदाफोर्ट जबलपूर एक्स्प्रेसचा विस्तार बल्लारशाह पर्यंत करा - उत्तर भारतीय प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली मागणी (Extend the Chandafort-Jabalpur Express to Ballarshah – North Indian passengers urge railway administration.)
बल्लारपूर :- जबलपूर ते चांदाफोर्टदरम्यान धावणाऱ्या जबलपूर इंटरसिटी एक्स्प्रेसचा विस्तार बल्लारशाह रेल्वे स्थानकापर्यंत करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील उत्तर भारतीय प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सध्या जबलपूर इंटरसिटी एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार - सकाळी ५.१५ वाजता जबलपूर येथून सुटते. ही रेल्वे मदन महल, नैनपूर, बालाघाट, गोंदिया आणि नागभीड या स्थानकांमार्गे दुपारी १.४० वाजता चांदाफोर्ट रेल्वे स्थानकावर पोहोचते. त्यानंतर ९० मिनिटांच्या विश्रांतीनंतर ही गाडी पुन्हा जबलपूरकडे रवाना होते.
चांदाफोर्ट आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकांमधील अंतर अवघे १० किमी असून उपलब्ध वेळेत ही गाडी बल्लारशाह पर्यंत जाऊन पुन्हा चांदाफोर्टला उत्तर भारतीय प्रवाशांचे रेल्वे प्रशासनाकडे निवेदन जबलपुर चांदा फोर्ट चांदाफोर्ट
परत येऊ शकते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. या गाडीचा विस्तार झाल्यास बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी तालुक्यातील हजारो उत्तर भारतीय प्रवाशांना मोठा लाभ होईल. तसेच बालाघाट, जबलपूर, कटनी, सतना, मैहर, चित्रकूट, प्रयागराज आणि वाराणसी या ठिकाणी प्रवास करणे अधिक सुलभहोणार आहे. याशिवाय, मैहर येथील प्रसिद्ध माता मंदिर, वाराणसीतील जगप्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर तसेच जबलपूरमधील भेडाघाट धुवाधार धबधबा आणि संगमरवरी टेकड्या या पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देणेही अधिक सोयीचे होणार असल्याचे प्रवाशांनी नमूद केले. जबलपूर इंटरसिटी बल्हारशाह रेल्वे स्टेशनपर्यंत केल्याने या परिसरात राहणाऱ्या उत्तर भारतीय प्रवाशांना मोठा फायदा होईल. बल्लारशाह ते बालाघाट, जबलपूर, कटनी, सतना, मैय्यर, चित्रकूट कर्बी धाम, प्रयागराज आणि वाराणसी येथे जाणे सोपे होईल. चंदन सिंह चंदेल, माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य. चंद्रपूर जिल्हा प्रवासी संघटनाद्वारे जबलपूर इंटरसिटी एक्स्प्रेसचा विस्तार बल्लारशाह रेल्वे स्टेशनपर्यंत करण्यासाठी रेल्वे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी पत्रव्यवहार करून उत्तर भारतीय प्रवाशांची मागणी पूर्ण करेल. श्रीनिवास सुंचुवार, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या