नागपूर -: 'पाण्याने पेटला वणवा' नाटकाच्या प्रकाशित पोस्टर समवेत - नाटकातील कलावंत महाड सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर मानवी प्रतिष्ठा, समानता आणि स्वाभिमानासाठी पेटलेल्या या मुक्तीलढ्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता आमदार राजकुमार बडोले लिखित पाण्याने पेटला वणवा" हे नाटक लवकरच मराठी रंगभूमीवर येणार आहे. प्रत्येक जिह्यात, तालुक्यात या 1. नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. या ऐतिहासिक नाटकाचे पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले, या पार्श्वभूमीवर आमदार | राजकुमार बडोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार बडोले म्हणाले, 'इतिहास केवळ स्मरणात ठेवण्यासाठी नसतो, तर त्यातून वर्तमानाला दिशा मिळावी यासाठी असतो. याच हेतूने महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा विचार आणि त्यामागील सामाजिक जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचावी. हाच उद्देश ठेवून नाटक लिहिले आहे'. तर, या नाटकाच्या माध्यमातून त्या संघर्षाची तीव्रता आणि त्याचा आजच्या समाजाशी असलेला संबंध
'पाण्याने पेटला वणवा' नाटकातून दोन कालखंडांचा प्रभावी संगम घडविण्याचा प्रयत्न केला आहे. कालचा हा मुक्तीलढा आज लागू पडतो. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा इतिहास उलगडत जातो, तर दुसऱ्या बाजूला त्या इतिहासाकडे पाहणारी आजची पिढी दिसते. शंभर वर्षांपूर्वीच्या संघर्षाचा अर्थ आजच्या समाजासाठी काय आहे, हा महत्त्वपूर्ण प्रश्न या नाटकातून उभा केला आहे राजकुमार बडोले, नाटकाचे लेखक. प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक प्रशांत निगडे म्हणाले. युगंधर क्रिएशन्सच्या 'पाण्याने पेटला वणवा'च्या निर्मिती प्रमुख शारदा राजकुमार बडोले आहेत. गणेश मोडक सहनिर्माते आहेत, तर मंदार देशपांडे यांचे संगीत दिग्दर्शक आहे. नाटकात शशांक पांचाळ, अजित रांजणे, मयुरेश मढवी, अमोल जाधव, प्रेम जेटीथोर, प्रांजल परब, सायली नंदा, राजू भिलारे, तेजस राजे, मयूरी निकम, महादेव जाधव आणि मृणाल खिस्मतवार हे कलावंत विविध भूमिका साकारणार आहेत. या प्रेरणादायी संघर्ष लवकरच रंगभूमीवर साकारणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या