Advertisement

Responsive Advertisement

बल्लारपूरात विविध शासकीय कार्यालयासह, शाळा महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा (Maharashtra Day was celebrated with great enthusiasm in Ballarpur, across various government offices, schools, and colleges.)

बल्लारपूरात विविध शासकीय कार्यालयासह, शाळा महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा (Maharashtra Day was celebrated with great enthusiasm in Ballarpur, across various government offices, schools, and colleges.)

बल्लारपूर :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार, १ मे रोजी बल्लारपूर शहरात उत्साहात साजरा करण्यात आला मुख्य शासकीय कार्यक्रम उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडला आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार,  उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले यावेळी  श्री अर्जुन पावरा, उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, तहसीलदार रेणुका कोकाटे, विशाल वाघ, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, अल्का वाढई, नगराध्यक्ष बल्लारपूर, देवेंद्र आर्य, उपाध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर, घनश्याम मुलचंदानी, हरीश शर्मा, लखनसिंग चंदेल, राजू झोडे, सिक्की यादव, भारत थुलकर यांच्या सह शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, पत्रकार व नागरिकांची उपस्थिती होती.


                  नगर परिषदेत महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा अल्का वाढई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वंदे मातरम्, राष्ट्रगीत तसेच महाराष्ट्र राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. महाराष्ट्र दिनासोबतच कामगार दिनाचाही संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने महाराष्ट्राच्या गौरवगाथा सांगणारी देशभक्तीपर व प्रेरणादायी गीते वाजविण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा अल्का वाढई यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना शहराच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सर्व कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार, उपमुख्याधिकारी संगीता उमरे, कार्यालयीन अधीक्षक नंदकिशोर सातपुते, सभापती अब्दुल करीम, ॲड. मेघा भाले, प्रियंका थुलकर, लेखाधिकारी अनिर्बन चक्रवर्ती यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


           दरम्यान, बल्लारपूर येथील ऐतिहासिक किल्ल्यावरही नगर परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रगीत राज्यगीत म्हणण्यात आले. तसेच बल्लारपूर शहरातील शाळा महाविद्यालयात ही ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला या अंतर्गत महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. रजत मंडल यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक वृंद, बल्लारपूर स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व खेळाळु व पदाधिकारी उपस्थित होते. एकूणच, देशभक्तीचा उत्साह, एकजूट आणि विकासाची भावना यांचा संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या