Advertisement

Responsive Advertisement

बुध्द पौर्णिमेच्या लखलखत्या प्रकाशात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना होणार ; १६८ मचाणींवर ४१० जण असणार (The wildlife census in the Tadoba-Andhari Tiger Reserve will be conducted under the radiant glow of Buddha Purnima; 410 personnel will be stationed across 168 watchtowers.)

चंद्रपूर : बुद्ध पौर्णिमेच्या उजळत्या व लखलखत्या चांदण्याच्या प्रकाशात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे वन्यजीव गणनेचा अनोखा उपक्रम आज शुक्रवारी १ मे रोजी पार पडणार आहे. बफर झोनमध्ये ६९ मचाणी उभारण्यात आल्या असून प्रत्येक मचाणीवर ३ जण अशा एकूण २१० तर कोरमध्ये ९९ मचाणी असून २०० अशा ४१० जणांचा सहभाग असणार आहे. विशेष म्हणजे या प्राणी गणणेसाठी जिल्ह्यासह जगभरातील पक्षीमित्र नोंदणी करीत असतात. सदर भाग कोअर झोन हा अतिसंवेदनशील क्षेत्र असल्याने येथे केवळ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वनाधिकारी आणि कर्मचारीच या गणनेची जबाबदारी सांभाळणार आहेत. दोन्ही झोनमध्ये एकत्रितपणे रात्रभर निरीक्षणाची ही प्रक्रिया चालणार आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता सुरू होणारी ही गणना शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत म्हणजेच सलग १२ तास सुरू राहणार आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने वन्यप्राणी पाणवठ्यांभोवती एकत्र येतात.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या