Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

धक्कादायक..! जनगणनेच्या कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी बल्लारपूरातील 4 खाजगी शाळेतील 29 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता (Shocking! Cases Likely to Be Registered Against 29 Teachers from 4 Private Schools in Ballarpur for Negligence in Census Duties.)

धक्कादायक..! जनगणनेच्या कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी बल्लारपूरातील 4 खाजगी शाळेतील 29 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता (Shocking! Cases Likely to Be Registered Against 29 Teachers from 4 Private Schools in Ballarpur for Negligence in Census Duties.)

बल्लारपूर :- जनगणना - २०२७ या राष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमाच्या कामकाजात कसूर व टाळाटाळ केल्याप्रकरणी बल्लारपूर शहरातील चार खासगी शाळांमधील एकूण २९ सहाय्यक शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली आहे. मा. मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालय, महाराष्ट्र, मुंबई यांच्या निर्देशानुसार जनगणना-२०२७ चा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणकांकडून घराघरांत जाऊन घरगणनेचे काम करण्यात येत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून विहित मुदतीत जनगणनेचे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. 
             नगर परिषद बल्लारपूरच्या हद्दीतील दिलासाग्राम कॉन्व्हेंट, आयडियल इंग्लिश स्कूल, वियानी ज्युबिली कॉन्व्हेंट आणि नचिकेत गुरुकुल कॉन्व्हेंट येथील एकूण २९ सहाय्यक शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नियुक्ती असूनही संबंधित शिक्षकांनी जनगणनेचे काम करण्यास कसूर केल्याचे तसेच कामात टाळाटाळ केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. प्रशासनाने जनगणना कार्यात नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या निर्देशांचे पालन करून विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. जनगणना हे राष्ट्रीय महत्त्वाचे कार्य असून नियुक्त प्रगणकांनी ते पार पाडणे कायद्याने बंधनकारक असताना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकांविरुद्ध जनगणना अधिनियम, १९४८ मधील कलम ११ (१) (अ) अन्वये बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी कळविले आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या