आर्थिक चणचणीतुन वेल्डिंग कामगारांची गळफास घेऊन आत्महत्या (Welding Worker Commits Suicide by Hanging Due to Financial Hardship)
बल्लारपूर :- आर्थिक अडचणींना कंटाळून एका वेल्डिंग कामगाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील साईबाबा वॉर्डात सोमवारी १८ मे रात्री सुमारे ९ वाजता वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतकाचे नाव नंदकिशोर नत्थूजीं ढवस (४४), रा. साईबाबा वॉर्ड, विसापूर असे आहे. त्यांनी आयटीआयमधून जोडारीचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर वेल्डिंग व जोडारीची कामे करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र मागील काही काळापासून नियमित काम मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबास आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. मुलगा व मुलीच्या शिक्षणाची चिंता त्यांना सतावत होती. उत्पन्न अपुरे पडत असल्याने पत्नी ज्योती ढवस या एका खासगी आस्थापनात काम करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. घटनेच्या दिवशी मुलगा व मुलगी गावातील आजी-आजोबांच्या घरी गेले होते. दरम्यान, नेहमीप्रमाणे कामावरून रात्री घरी परतलेल्या ज्योती ढवस यांना पती नंदकिशोर हे घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हा प्रकार पाहताच त्यांनी आक्रोश केला. शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. नुकतीच मृतकांच्या लहान भावाचे आजाराने निधन झाले होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या