Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

विसापूर १७ वर्षीय युवकाची निर्घृण हत्येप्रकरणी, विधीसंघर्ष बालकासह ५ आरोपी ताब्यात (Visapur: 5 Accused, Including a Juvenile in Conflict with the Law, Detained in Connection with the Brutal Murder of a 17-Year-Old Youth.)

विसापूर १७ वर्षीय युवकाची निर्घृण हत्येप्रकरणी, विधीसंघर्ष बालकासह ५ आरोपी ताब्यात (Visapur: 5 Accused, Including a Juvenile in Conflict with the Law, Detained in Connection with the Brutal Murder of a 17-Year-Old Youth.)

तीन महिन्यांपूर्वीच्या वादाची रक्तरंजित पार्श्वभूमीतून हत्या 

बल्लारपूर :- तीन महिन्यांपूर्वी झालेल्या जुन्या वादातून विसापूर येथे १७ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. आरोपींनी युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्यानंतर दगडाने डोके ठेचून त्याची हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणात बल्लारपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत एका विधी संघर्ष बालकासह पाच आरोपींना नागपूर येथून ताब्यात घेतले. मृत युवकाचे नाव विराज राजेश आगदरी (वय १७) रा. किल्ला वॉर्ड, बल्लारपूर असे आहे. तर आरोपींमध्ये मोनू उर्फ रौनक सुखपाल निषाद (१९), आकाश रामकरन निषाद (२१) दोघेही रा. भगतसिंग वॉर्ड, जिशान शरीफ सिद्दीकी (१९) रा. सुभाष वॉर्ड, समीर कलीम खान (२१) रा. दादाभाई नौरोजी वॉर्ड तसेच एका विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे. 
         पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक विराज आगदरी व आरोपी यांच्यात सुमारे तीन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. शुक्रवारी सायंकाळी विराज हा आपल्या मित्रांसह विसापूर येथील तुकडोजी चौकातील एका हेअर सलूनमध्ये गेला असता आरोपी दोन दुचाकींवर तेथे पोहोचले. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे असल्याचे पाहून युवकांनी पळ काढला. दरम्यान, आरोपींनी विराजचा पाठलाग करून महात्मा फुले चौक ते सुरभी चौक मार्गावर त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या विराजच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याला ठार मारण्यात आल्याचे समोर आले आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून दुचाकी व मोपेडने पसार झाले होते. घटनास्थळी पोलीस अधीक्षक आयुष निपाणी तसेच अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक निर्देश दिले होते. घटना घडल्यानंतर बल्लारपूर पोलीस ॲक्टिव्ह मोडमध्ये येत अवघ्या २४ तासांच्या आत आरोपींना नागपूर येथून बेड्या ठोकून बल्लारपूर येथे आणण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या