Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

धक्कादायक ! बल्लारपूरात वाढदिवसाच्या पूर्वसंध्याला 17 वर्षीय तरुणाची निघृण हत्या (Shocking! 17-Year-Old Youth Brutally Murdered in Ballarpur on the Eve of His Birthday)

धक्कादायक ! बल्लारपूरात वाढदिवसाच्या पूर्वसंध्याला 17 वर्षीय तरुणाची निघृण हत्या (Shocking! 17-Year-Old Youth Brutally Murdered in Ballarpur on the Eve of His Birthday)

विसापूर :- बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील विसापूर गावात सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. 17 वर्षीय युवकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. मृतकाचे नाव: विन्या बापू आगदर्शी, वय 17, रा. किल्ला वॉर्ड, बल्लारपूर असून उद्या 19 तारखेला त्याचा वाढदिवस होता, अशी माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार बल्लारपूर शहरातील चार युवक विसापूर येथे गेले होते. आपसी वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी देखील बल्लारपूर शहरातीलच असल्याची माहिती मिळत आहे बल्लारपूर येथील गुंडांची टोळी दोन मोटारसायकलींवरून विसापूर येथे दाखल झाली होती. पाच ते सहा जणांच्या या टोळीने तुकडोजी चौक परिसरातून विराजचा पाठलाग सुरू केला. सुरुवातीला आरोपींनी त्याच्यावर खंजीराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विराजने प्रसंगावधान राखत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपींनी रेल्वे फाटक जवळ त्याला घेराव घालत दगडाने डोक्यावर वार केले. या हल्ल्यात विराज गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत.  तसेच पूर्वनियोजित कट रचून हत्या केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. हत्या का केली? जुने वैमनस्य होते का? आरोपी कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासात लवकरच मिळतील. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, मदन दिवटे, पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे तसेच उमेश जोगदंड यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. शवाचे पंचनामा करून शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले. दरम्यान, हत्या करून आरोपी फरार झाले असून पोलीस पथक त्यांचा मागावर आहे. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या