बल्लारपूर :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी अभिप्रेत असलेले शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर बल्लारपूरात 25 एप्रिल 2026 ला बल्लारपूर येथील गोंडराजे नाट्यगृहात पार पडले. ज्ञानज्योती अभियान अंतर्गत 'आम्ही साथी बहूउद्देशीय संस्था व स्वयंप्रेरित कार्यकर्ता बल्लारपूर' यांच्या संयुक्त माध्यमातून या शैक्षणिक मार्गदर्शन शिबीराच आयोजन करण्यात आले होते. शिबिराला मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यासोबतच पालकांची उपस्थिती होती या मार्गदर्शन कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून एड. बोधी रामटेके, मा. निलेश नन्नावरे, नेचर फाउंडेशन, नागपूर, मा. अर्जुन पावरा, उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, प्रा. संजय दुधे, गुरुनानक विज्ञान महाविद्यालय, बल्लारपूर मा. प्रकृती पाटील, माजी मुख्याध्यापक गोंडपिपरी, मा. रोहित चुटे, संभाजी ब्रिग्रेड, बल्लारपूर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रश्मी बारसागडे यांनी केले. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना एड. बोधी रामटेके म्हणाले की " विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षणाच्या भरपूर संधी उपलब्ध असून त्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा तसेच प्रत्येकानी आपल्या अधिकाराविषयीं जागृत असले पाहिजे त्यामुळं स्वतः सोबत समाजाचा विकास ही घडण्यास मदत प्राप्त होईल विशेष म्हणजे बोधी सरांनी देशांतर्गत सोबत परदेशी शिक्षणाच्या अनेक संधी बाबत मार्गदर्शन केले. "
यानंतर मार्गदर्शन करतांना मा. निलेश नन्नावरे सर म्हणाले की, " शिक्षण हे विदयार्थ्यांना मोफत व सक्तीचे असले पाहिजे ही शासनाचे धोरण असले तरी वर्तमान व्यवस्था ही शिक्षण उपलब्ध करून देत नाही आज मराठी माध्यमाच्या अनेक शाळा बंद पडत आहे. तसेच वर्तमान शिक्षण व्यवस्था ही विद्यार्थ्यांना पुरेपूर माहिती देण्यास असमर्थ ठरली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध असून त्याची योग्य माहिती विद्यार्थ्याकडे पोहोचवी गेली पाहिजे. यासोतच विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवृत्ती बाबत माहिती ही दिली. यानंतर मा. अर्जुन पावरा यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विविध क्षेत्रात प्रविण्य प्राप्त करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी बुद्धशील बहादे, रवी मेश्राम, अमोल वर्मा, गौरव वाळके, यांच्या सह अनेकांचे सहकार्य लाभले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


0 टिप्पण्या