महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध उपक्रम, विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादऱीकरण (Various activities and demonstrations of yoga postures and Pranayama were held at Mahatma Jyotiba Phule College to mark International Yoga Day.)
बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूर द्वारे संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आणि बल्लारपूर स्पोर्ट्स बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज 21 जून रविवार ला आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, बी.एस.बी.एस.चे व्हॉलीबॉल खेळाडू तसेच एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून योगाविषयी जनजागृती करत निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. सहभागी विद्यार्थ्यांनी आणि खेळाडूंनी नियमित योग करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. व कार्यक्रमा दरम्यान प्रा. डॉ. सतीश कर्णासे यांनी निरोगी जीवनासाठी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. तसेच बी.एस.बी.एस.चे अध्यक्ष प्रमोद आवते यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित करत नियमित योग केल्याने होणाऱ्या विविध शारीरिक व मानसिक फायद्यांची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी प्रा. महेंद्र भोंगाडे, प्रा. युवराज बोबडे, वन विभागाचे अधिकारी कोल्हे तसेच माजी सैनिक संजय कुबडे यांच्यासह डॉ. बादलशहा चव्हाण, प्रा. प्रा. डॉ. किशोर चौरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. ललित गेडाम प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. सोनवणे सर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व एनसीसी च्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


0 टिप्पण्या