बल्लारपुरातील कलावंत भारती डुंबेरे यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड प्रयत्न, १५ तास अखंड गायनाचा संकल्प (Ballarpur-based artist Bharati Dumbere attempts the 'India Book of Records'—a resolve to perform 15 hours of continuous singing.)
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भारती डुंबेरे यांनी सांगितले की, या विक्रमासाठी त्या मागील सहा महिन्यांपासून सातत्याने सराव करीत आहेत. त्यांच्या मते, हा प्रयत्न त्यांच्या दीर्घ संगीत साधनेचा परिपाक आहे. या कार्यक्रमाचे आयोजन वुमन्स पॉवर मल्टीपर्पज ऑर्गेनायझेशन, बल्लारपुर यांच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा पौर्णिमा टिपले व सचिव किरण भांबोरे उपस्थित होते. आयोजकांनी नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या