Advertisement

Responsive Advertisement

बुध्द जयंतीच्या पर्वावर बल्लारपुरात १ मे रोजी 'धम्मचक्र' महानाट्याचे आयोजन (On the occasion of Buddha Jayanti, the grand drama 'Dhammachakra' is being organized in Ballarpur on May 1st.)

बुध्द जयंतीच्या पर्वावर बल्लारपुरात १ मे रोजी 'धम्मचक्र' महानाट्याचे आयोजन (On the occasion of Buddha Jayanti, the grand drama 'Dhammachakra' is being organized in Ballarpur on May 1st.)

बल्लारपूर :- बुद्ध पौर्णिमा समारोह समिती, पेपर मिल बल्लारपूरच्या वतीने दरवर्षी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते या माध्यमातून विविध क्षेत्रात प्रविण्य प्राप्त करणाऱ्यांचा सन्मान केला जातो या वर्षीही बुध्द जयंतीचे औचित्य साधून दि. १ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजता भव्य 'धम्मचक्र' महानाट्याचे आयोजन केले आहे. पेपरमिल येथील कलामंदिरच्या रंगमंचावर नागपूर येथील कृती थिएटर अँड स्पोर्ट अकादमीच्या वतीने हे ऐतिहासिक सांस्कृतिक सादरीकरण केले जाणार आहे. हे महानाट्य सर्वांसाठी निःशुल्क असून, यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचा संघर्ष आणि समता-बंधूतेचा संदेश देणारा बौद्ध धम्म या विषयांवर आधारित प्रभावी दृश्ये पाहायला मिळणार आहेत. तरी या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या