जनगणना 2027’ अंतर्गत 1 ते 15 मे दरम्यान नागरिकांना स्वयंगणना करण्याची सुविधा (Under ‘Census 2027’, citizens will have the facility to conduct self-enumeration between May 1 and May 15.)

Vidyanshnewslive
By -
0
जनगणना 2027’ अंतर्गत 1 ते 15 मे दरम्यान नागरिकांना स्वयंगणना करण्याची सुविधा (Under ‘Census 2027’, citizens will have the facility to conduct self-enumeration between May 1 and May 15.)


चंद्रपूर, दि. 23 : ‘जनगणना 2027’ चा कार्यक्रम जाहीर झाला असून देशातील ही पहिलीच डिजिटल जनगणना आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. 2011 च्या जनगणनेनंतर तब्बल 15 वर्षांनी ही जनगणना होत असून जनगणनेतील माहितीचा उपयोग देशाच्या विकासाकरीता व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता उपयुक्त ठरत असते. चंद्रपूर जिल्ह्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी 1 मे ते 15 मे 2026 या पंधरा दिवसांच्या कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी https://se.census.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर भेट देऊन आपली माहिती भरावयाची आहे. यात कुटुंब प्रमुखाचे नाव, 10 अंकी मोबाईल क्रमांक आदींचा समावेश आहे. या पोर्टलवर विविध भाषांमध्ये माहिती भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती यशस्वीरीत्या भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक (आयडी) प्राप्त होईल, जो नागरिकांनी अत्यंत सुरक्षितपणे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. दुस-या टप्प्यात जेव्हा प्रगणक घरभेटीसाठी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी दिल्यास प्रगणक तो पोर्टलवर अपलोड करतील आणि नागरिकांची माहिती अधिकृतरीत्या जनगणनेत नोंदवली जाईल. यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असल्याने, माहिती संकलनासाठी विशेष ॲप्लिकेशन्सचा वापर केला जाणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष कुटुंबाची तसेच घराची सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी 'ॲप' वापरले जाणार आहे. या अद्ययावत प्रक्रियेद्वारे घराची स्थिती, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, आणि मालमत्ता याबद्दलची सखोल माहिती घेतली जाईल. या वेब पोर्टलमध्ये भरलेली नागरिकांची सर्व वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहणार आहे. जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन : जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. नागरिकांनी आपल्या वेळेनुसार 1 मे ते 15 मे दरम्यान घरबसल्या स्वयंगणना पोर्टलचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच दुस-या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करून आपल्या कुटुंबाची अचूक आणि परिपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)