बल्लारपूर :- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथील विद्यार्थ्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव मिळण्यासाठी तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते या अंतर्गत विविध स्पर्धा अंतर्गत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मेहेंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, केशरचना स्पर्धा सह फॅशन स्पर्धा, व नृत्य स्पर्धा अशा अनेक स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं होत.
या सांस्कृतिक महोत्सवाच्या उदघाटनीय समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून मा. अंकित संजय कायरकर, मा. रजत मंडल, प्रभारी प्राचार्य मा. किरण चंदेल, मुख्याध्यापक साईबाबा ज्ञानपीठ, व नगरसेविका नगर परिषद बल्लारपूर, मा. तेजस्विनी येगीनवार, मा. विभावरी नखाते, सांस्कृतिक विभाग प्रमुख यांची विचारमंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून झाली. यानंतर मान्यवर अतिथीचे स्वागत पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.
यानंतर आपले मनोगत व्यक्त करतांना किरण चंदेल म्हणाल्यात की, "स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळतो यासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात अधिकाधिक भर टाकण्याचा प्रयत्न करावा व आपल्या जीवनात यश मिळवावे. " यानंतर आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ. रजत मंडल सर म्हणालेत की, " विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगताना ज्ञानाचा योग्य रित्या वापर करावा तसेच येत्या काही दिवसात विद्यापीठाच्या परीक्षेला सकारात्मक रित्या सामोरे जावे." या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलांचं प्रदर्शन केलं.
निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार कु. चित्रलेखा गोंधळी, द्वितीय पुरस्कार, कु. रुक्षिका गोंडाने, तृतीय पुरस्कार कु. याचना जवंजाळ, केशरचना स्पर्धेत प्रथम पुरस्कार कु. साक्षी बावणे, द्वितीय पुरस्कार कु. शोयबा सय्यद, तृतीय पुरस्कार कु निशा वर्मा, मेहेंदी स्पर्धेत प्रथम पुरस्कार कु. शोयबा सय्यद, द्वितीय पुरस्कार कु.मान्यता रामटेके, तृतीय पुरस्कार अर्चना वर्मा, रांगोळी स्पर्धेत प्रथम पुरस्कार कु. मनीषा चंद्रावरकर, द्वितीय पुरस्कार कु. चित्रलेखा गोंधळी, तृतीय पुरस्कार कु. साक्षी बावणे, चित्रकला स्पर्धेत प्रथम पुरस्कार कु. शोयबा सय्यद, द्वितीय पुरस्कार कु. निशा वर्मा, तृतीय पुरस्कार, साहिल राम यांनी प्राप्त केला.
तर यासोबतच सांस्कृतिक महोत्सवाचं फॅशन स्पर्धा व सोलो डान्स व ग्रुप डान्स मध्ये ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला या सर्व स्पर्धातील विजयी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या सांस्कृतिक महोत्सवाचं संचालन प्रा. श्रद्धा कवाडे तर आभार प्रदर्शन प्रा. राजेंद्र साखरे यांनी केले. या सांस्कृतिक महोत्सव यशस्वीततेसाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068






टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या