Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा (Librarian's Day Celebrated with Enthusiasm at Mahatma Jyotiba Phule College)

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा (Librarian's Day Celebrated with Enthusiasm at Mahatma Jyotiba Phule College)

बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूरद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथे १२ ऑगस्ट रोजी ग्रंथपाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. विनय कावाडे, नॅक समन्वयक तथा ग्रंथालय विभागप्रमुख प्रा. डॉ. पंकज कावरे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पंकज कावरे यांनी सांगितले की, १२ ऑगस्ट हा दिवस भारताचे महान ग्रंथालयशास्त्रज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. ज्ञानाचे मंदिर असलेल्या ग्रंथालयांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि पुस्तक व वाचक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ग्रंथपालाची भूमिका बजावणे, हे ग्रंथालय व्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रंथालयाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश घराघरात पोहोचविण्यात डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट प्रा. योगेश टेकाडे, प्रा. डॉ. पल्लवी जंगरे, प्रा. कवाडे, प्रा. पंकज नंदूरकर, प्रा. रोशन साकरे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री. अशोक जी. गर्गेलवार, श्री. शामराव जी. दरेकर यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, ग्रंथालयाचा नियमित वापर आणि ज्ञानार्जनाची संस्कृती वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या