Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

महात्मा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्याचा 80 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा (80th Anniversary of Independence Celebrated with Enthusiasm at Mahatma Phule College)

महात्मा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्याचा 80 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा (80th Anniversary of Independence Celebrated with Enthusiasm at Mahatma Phule College)


बल्लारपूर :- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले या भारतीय स्वातंत्र्याचा आज 80 वा वर्धापन दिन बल्लारपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या अंतर्गत बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने सकाळी 8:15 वाजता राष्ट्रध्वजारोहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ रजत मंडल यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संजय भाऊ कायरकर, मा. लाभशंकर कायरकर यांची उपस्थिती होती. 


        तत्पूर्वी 21 महाराष्ट्र बटालियन वर्धा अंतर्गत महाविद्यालयाच्या 108 एनसीसी कॅडटनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली त्यानंतर एनसीसीचे पथसंचलन सह प्रात्यक्षिक करण्यात आली विशेष म्हणजे ध्वजारोहणा नंतर एनसीसी गीत राष्ट्रगाणं (वंदे मातरम), महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत गाण्यात आले. यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केली तर आपल्या भाषणातून महापुरुषांना स्मरण केले. 


          या नंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व विषद करून हुतात्म्यानां अभिवादन केले व विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्यात. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. शुभांगी भेंडे(शर्मा) तर आभार प्रदर्शन प्रा. ले. योगेश टेकाडे यांनी केले. या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या