Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

धक्कादायक...! विसापूरातील धम्मभूमीवरील बुध्दमूर्ती चोरण्याचा चवथ्यांदा प्रयत्न, नागरिकांत संताप (Shocking...! Fourth attempt to steal the Buddha statue from the Dhammabhumi in Visapur; citizens outraged.)

धक्कादायक...! विसापूरातील धम्मभूमीवरील बुध्दमूर्ती चोरण्याचा चवथ्यांदा प्रयत्न, नागरिकांत संताप (Shocking...! Fourth attempt to steal the Buddha statue from the Dhammabhumi in Visapur; citizens outraged.)

धम्मभूमीवरील परिसरात पुरेशा उपाययोजना करून सुरक्षा बळकट करण्याची मागणी 

बल्लारपूर :- बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील धम्मभूमी परिसरात अज्ञात व्यक्तीने बुद्धमूर्तीच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेली लोखंडी जाळी तोडून मूर्ती चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांसह बौद्ध समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिस प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीचा तातडीने शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे. धम्मभूमी हे परिसरातील नागरिकांसाठी श्रद्धेचे तसेच सामाजिक एकतेचे महत्त्वाचे केंद्र आहे. अशा ठिकाणी संरक्षण जाळी तोडून बुद्धमूर्ती चोरी करण्याचा प्रयत्न होणे ही चिंताजनक बाब असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. 
         विशेष म्हणजे, विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार धम्मभूमी परिसरात यापूर्वीदेखील मूर्ती तसेच धम्मध्वज चोरी करण्याचे किंवा चोरीचा प्रयत्न करण्याचे तब्बल चार वेळा प्रकार घडल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात आला आहे. वारंवार अशा घटना घडत असतानाही परिसराच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे. या घटनेमागील नेमका उद्देश काय होता, याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय धम्मभूमी परिसरात रात्रीच्या वेळी पुरेसा विद्युत प्रकाश नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे परिसरात तातडीने विद्युत प्रकाश व्यवस्था करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायतीने धम्मभूमी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संपूर्ण परिसरावर देखरेख ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणातील अज्ञात आरोपीचा २४ तासांच्या आत शोध घेऊन अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निर्धारित वेळेत आरोपीला अटक करण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरल्यास पोलीस ठाण्यासमोर शांततामय आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.  दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या