बल्लारपूर :- नॅशनल कॅडेट कॉर्प विभाग आणि रेड रिबन क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिना निमित्त महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यां मध्ये एड्स जागरूकता मोहीम राबविण्यात आली. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी एड्स विरोधात शपथ घेतली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वरिष्ठ प्राध्यापक डॉ. रोशन फुलकर होते तर सन्माननीय मुख्य अतिथी म्हणून श्री. सचिन तल्हार समुपदेशक, आयसीटीसी, ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, श्रीमती स्मिता काकडे ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, तसेच श्रुती तल्हार संकल्प बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर, उपस्थित होते.
युवा दिनानिमित्त आयोजक लेफ्टनंट योगेश टेकाडे असोसिएट एनसीसी अधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले तसेच विद्यार्थ्यांना एडस विरुद्ध शपथ दिली. आंतरराष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सचिन तल्हार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ज्यात त्यांनी एड्स आणि एच आई वी पासून स्वतःला आणि समाजाला सुरक्षित ठेवावे यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमा चे अध्यक्ष डॉ रोशन फुलकर यांनी सांगितले की विद्यार्थीनी आपली युवा शक्ती ला ओळखावी आणि त्याचा वापर करून समाजात परिवर्तन घडवून आणावे. प्रसंगी डॉ. नखाते, डॉ. जुनघरे, डॉ. माकोडे, प्रा. साखरे, इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थी सहभागी झाले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी पी एल पिंपळशेंडे यांनी केले आणि आभार कॅडेट सुकन्या वर्मा यांनी मानले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या