Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूरात दूषित पाणी पुरवठ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना निवेदन (Memorandum submitted to the Maharashtra Jeevan Pradhikaran by the Social Justice Department of the Nationalist Congress Party regarding the contaminated water supply in Ballarpur.)

बल्लारपूरात दूषित पाणी पुरवठ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना निवेदन (Memorandum submitted to the Maharashtra Jeevan Pradhikaran by the Social Justice Department of the Nationalist Congress Party regarding the contaminated water supply in Ballarpur.)

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे होत असलेल्या दुर्गंधी व दूषित पाणीपुरवठा बाबत निवेदन देण्यात आले. दिनांक 11/3/2026 ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हा चंद्रपूरच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय येथे जाऊन मा. उपविभागीय अभियंता साहेब महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना निवेदन देण्यात आले की बल्लारपूर शहरांमध्ये होत असलेल्या पाणीपुरवठा मध्ये दुर्गंध येत असून पाणीसुद्धा गडुळ आहे. त्यांना सांगण्यात आले की आठवड्याभरामध्ये सुरळीत पद्धतीने शुद्ध पाणी बल्लारपूर नगरीतील वासियांना देण्यात यावे. आज घडीला दूषित पाणी जनतेला पोहोचत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात बल्लारपूर नगरीमध्ये जनतेला आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे. जर आठवड्याभरात प्रश्न मार्गी न लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हा चंद्रपूरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान कुठलीही हानी झाल्यास त्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र जल प्राधिकरण विभाग यांची राहणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ झांमरे यांनी दिला. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांतभाऊ झांमरे, ओमभाऊ रायपुरे, सुरजभाऊ चौबे, सविता नाईक, शुभांगी मजगवळी, गायत्री चव्हाण, शिल्पा चव्हाण, कल्पना खंडागळे, मोनिका तामगाडगे, मनीषा वाळके, शितल नाईक, कविता शंभरकर, अनिता चीकाटे इत्यादी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या