पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर राष्ट्रपतींचा अपमान झाला मग संसद भवनाच्या व राम मंदिराच्या उदघाटन सोहळ्याच्या वेळी उपस्थित नव्हत्या तेव्हा अपमान नाही झाला ? If the President was insulted during her visit to West Bengal, then was she not insulted when she was absent from the inauguration ceremonies of the Parliament House and the Ram temple ?

Vidyanshnewslive
By -
0
पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर राष्ट्रपतींचा अपमान झाला मग संसद भवनाच्या व राम मंदिराच्या उदघाटन सोहळ्याच्या वेळी उपस्थित नव्हत्या तेव्हा अपमान नाही झाला ? If the President was insulted during her visit to West Bengal, then was she not insulted when she was absent from the inauguration ceremonies of the Parliament House and the Ram temple ?

वृत्तसेवा :- देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नुकत्याच पश्चिम बंगालमध्ये गेल्या होत्या. देशाच्या राष्ट्रपती या नात्याने त्या देशांतर्गत आणि जगात कुठंही दौरा करू शकतात. तशा त्या पश्चिम बंगालमध्ये गेल्या. त्या तिथं ज्या कामासाठी गेल्या त्यापेक्षा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या स्वागताला आल्या नाहीत याची जास्त चर्चा आहे. ही सल स्वतः राष्ट्रपती मुर्मू यांनीही बोलून दाखवली. त्यावर ममता बॅनर्जी यांनी स्पष्टीकरण दिल. ज्या राज्यात राष्ट्रपतींचा दौरा आहे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला अगोदर कल्पना दिलेली असते. इथं बॅनर्जी यांना कसलीही कल्पना न देता हा दौरा होता. मग मुद्दा हा की असा न सांगता दौरा का ठरवला? बॅनर्जी स्वागताला आल्या नाहीत हे सत्य असेल तर असं न सांगता राष्ट्रपतींनी जण कस योग्य? आता बंगालच्या निवडणुका तोंडावर आहेत. मुर्मू यांना दौऱ्यावर पाठवलं आणि त्यांच्या दौऱ्याच पाहिजे तस पंतप्रधान मोदी आणि भाजपने राजकारण सुरु केलं. महिलेचा अपमान केला असं न म्हणता आदिवासी महिलेचा अपमान केला म्हणून बोंब उठवली. त्या आता राष्ट्रपती आहेत कि आदिवासी आहेत? वारंवार आदिवासी महिला राष्ट्रपती केली म्हणायचं, अपमान झाला म्हणायचं म्हणजे नक्की काय होत? आणि असा अपमान होत असेल तर राम मंदिराचं उद्गाटन केलं तेव्हा नाही दिसल्या आदिवासी राष्ट्रपती? तो नव्हता अपमान? देशाच्या सर्वोच्च सभागृहाचं म्हणजे लोकसभा सभागृहाच्या उद्गाटनला नाही दिसल्या आदिवासी राष्ट्रपती? तो नव्हता का अपमान? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला एक महिला आणि आदिवासी राष्ट्रपती म्हणणाऱ्या मुर्मू यांना मणिपूर आणि मणिपूरची महिला जळताना नाही दिसली कधी? तेव्हा नाही काही शल्य वाटलं? 
                  इतकं कोडगं वागणं आणि राजकारण कस जमतं? आपण देशाच्या सर्वोच्च पदावर आहोत. कुठल्याही एका पक्षाचे प्रतिनिधी नसून देशाचे आहोत याच भान खरच या आदिवासी राष्ट्रपतींना नाही का? खरं तर एखाद्या पक्षाकडे बहुमत असत आणि त्यांनी ठरवलं तर कुणीही राष्ट्रपती होईल अशी राजकीय स्थिती असते म्हणून या असल्या लोकांना संधी मिळते. ज्या पदाला कायम रबर स्टॅम्प म्हणतात ते कस खरं आहे हे दाखवणाऱ्या सध्याच्या महामहिम आहेत. कधीकाळी डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. अब्दुल कलाम ते प्रणब मुखर्जी अशी कणा असलेली मंडळी या पदावर होती. 2014 पासून कणाहीन आणि भूमिकाहीन लोक या पदावर बसवलीत आणि हवे ते नाचवलीत. त्यामुळेच तुम्ही पन्नासवेळा पश्चिम बंगालला याल, मग आम्ही सारखं तुमच्या स्वागताला येणार का असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. आता राष्ट्रपती मुर्मू यांनी विचार केला पाहिजे ममता बॅनर्जीही एक महिला आहेत, त्या आज देशात एका सत्तेशी कशा लढतात आणि आपण राष्ट्रपती असून कसे कणाहीन झालो. बाकी, 2014 नंतर राष्ट्रपती कोणत्या दर्जाचे आहेत, कोणत्या अनुभवाचे आहेत यापेक्षा ते कोणत्या जातीचे आणि धर्माचे आहेत हे जास्त महत्वाचं ठरवलं जातंय. रामनाथ कोविंद यांनी काय केलं आणि ते कोणत्या आधारावर राष्ट्रपती झाले तर ते दलित आहेत म्हणून झाले. पण कुणी सवर्ण म्हणून राष्ट्रपती तर कुणी दलित म्हणून राष्ट्रपती असं असत का? या देशाच्या स्वातंत्र्यानंतर कोणत्या क्षेत्रात आणि कोणतं विधायक त्यांचं काम आहे यावर राष्ट्रपती ठरवायचे कि धर्म आणि जात पाहायची? देशाच्या सर्वोच्च पदावर व्यक्ती नेमताना तो काय दर्जाचं काम करणारा किंवा केलेला आहे यापेक्षा तो कोणत्या जात धर्म समूहातील हे पाहिलं जात असेल, तर त्या देशाची काय स्थिती असेल? काय दर्जाचं हे राजकारण आहे?

संकलन :- गणेश पोकळे 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)