बल्लारपूर :- तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्या निवेदनानुसार तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, गॅस टंचाईबाबत पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
सध्या बल्लारपूर तालुक्यात तीन गॅस एजन्सी कार्यरत आहेत, ज्या एकूण ६६,६१३ ग्राहकांना गॅस पुरवठा करत आहेत. प्रशासनाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या एजन्सींद्वारे गॅस वितरण नियमितपणे सुरू आहे. १३ मार्च रोजी तालुक्यात १,२३९ गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले आणि १४ मार्च रोजी १,५०९ ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळतील असे प्रशासनाने स्पष्ट केले. तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी सांगितले की, तालुक्यात गॅस सिलिंडरची कमतरता नाही, नागरिकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये आणि गरजेनुसार गॅस वितरण नियमितपणे सुरू राहते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या