लोहारडोंगरी लोहखाण प्रकल्पाची शिफारसवजा परवानगी रद्द होणार ! (The recommendation-based approval for the Lohardongri Iron Ore Mine Project is set to be revoked !)
महसूल व वन विभागाचे विशेष कार्य अधिकारी उदय ढगे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री प्रा. अशोक ऊईके याच्या समक्ष उपोषण सोडले
चंद्रपूर :- लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पाची राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने केलेली शिफारस वजा परवानगी मंडळाच्या येत्या बैठकीत रद्द करण्यात येईल या आशयाचे महसूल व वन विभागाचे विशेष कार्य अधिकारी उदय ढगे यांचे पत्र घेऊन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री प्रा. अशोक ऊईके घेऊन उपोषण मंडपात पोहचल्यानंतर इको प्रो संस्थेचे बंडू धोतरे यांनी लिंबू पाणी पिऊन सलग नऊ दिवसापासून सुरू असलेले उपोषण सोडले. लोहारडोंगरी खाण प्रकल्पाला राज्याच्या वन्यजीव मंडळाने परवानगी दिली होती. ही परवानगी तात्काळ रद्द करावी तसेच इतर १६ मागण्यांसाठी बंडू धोतरे यांचे नऊ दिवसापासून उपोषण सुरू होते. आज वन्यजीव मंडळाची बैठक घेऊन परवानगी नाकारण्यात येईल तसे पालकमंत्री अशोक ऊईके यांनी दिले आहे. विशेष म्हणजे लेखी पत्र किंवा आश्वासन राज्य सरकार देत नाही तोवर आणि 'तूर्तास स्थगिती' हे आश्वासन असू शकत नाही अशी स्पष्ट भूमिका उपोषणकर्ते धोतरे यांनी घेऊन उपोषण सुरूच ठेवले होते.
शुक्रवारी जिल्हाधिकारी विनय गौडा व मुख्य वनसंरक्षक यांंच्या समक्ष यासंदर्भात बंडू धोतरे व सहकाऱ्यांची बैठक झाली. तेव्हाही धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरूच राहणार असल्याची माहिती दिली होती. मात्र शासन तसेच जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर शुक्रवार सायंकाळपासूनच तसे पत्र काढण्यासाठी धावपळ सुरू होती. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी पत्र आल्यानंतर सदर पत्र पालकमंत्री अशोक ऊईके, आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषणकर्ते बंडू धोतरे यांना देण्यात आले. पत्र वाचून धोतरे यांचे समाधान झाल्यानंतर आणि मागणीची पूर्तता झाल्यानंतर पालकमंत्री अशोक ऊईके यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आलीं. विशेष म्हणजे उपोषण सुरू असताना नऊ दिवसाच्या कालावधीत धोतरे यांना दोन वेळा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते गुरूवारी रात्री धोतरे यांना रुग्णालयात भरती केले होते, त्यानंतर आवश्यक उपचार घेऊन शुक्रवारी सकाळी धोतरे उपोषण मंडपात परतले. “जोपर्यंत शासन खाण प्रकल्पाच्या वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्याबाबत ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा निर्धार धोतरे यांनी व्यक्त केला होता. दरम्यान शेवटी धोतरे यांच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने तातडीने पत्रात बदल केला आज "राज्य वन्यजीव मंडळाच्या ६.१.२०२६ रोजीच्या बैठकीत उक्त खाण प्रकल्पास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे विविध अटी व शर्तीच्या आधारे शिफारशीत करण्यात आले आहे. बंडू धोतरे यांच्या सोबत या आंदोलनात प्रा योगेश दुधपचारे, अभय बडकेलवार, किशोर जामदार, अब्दुल जावेद यांच्यासह असंख्य लोक सहभागी झाले होते. तसेच सलग नऊ दिवस वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या