5 राज्याचा विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले 4 राज्यात एका टप्प्यात तर पश्चिम बंगाल मध्ये 2 टप्प्यात निवडणुका, 4 मे ला पाच ही राज्यांचा निकाल (The trumpet of assembly elections in 5 states has sounded. Elections will be held in 4 states in one phase and in West Bengal in 2 phases. The results of these five states will be declared on May 4.)

Vidyanshnewslive
By -
0
5 राज्याचा विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले 4 राज्यात एका टप्प्यात तर पश्चिम बंगाल मध्ये 2 टप्प्यात निवडणुका, 4 मे ला पाच ही राज्यांचा निकाल (The trumpet of assembly elections in 5 states has sounded. Elections will be held in 4 states in one phase and in West Bengal in 2 phases. The results of these five states will be declared on May 4.)

महाराष्ट्रातील राहुरी व बारामती विधानसभा पोट निवडणूक 23 एप्रिलला तर मतमोजणी 4 मे ला होईल

 
नवी दिल्ली :- देशभरातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यावर्षी या निवडणुकांसाठी सर्व तयारी सुरू आहे. वृत्तानुसार, निवडणूक आयोग आज या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची अपेक्षा आहे. निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेण्याची अपेक्षा आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यामध्ये चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे. ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या राज्यांमधील विधानसभेचा कार्यकाळ मे आणि जूनमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. विशेष सघन मतदार यादी पुनरावृत्ती (SIR) अंतर्गत चारही राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतिम मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. सर्व राजकीय पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने पश्चिम बंगालमधील उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. आसाममध्ये सर्व 125 मतदारसंघात एका टप्प्यात तसेच केरळमध्येही 140 विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 9 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. तामिळनाडूतील 234 विधानसभेसाठी एका टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी दोन टप्प्यात 152 आणि 142 मतदारसंघात अनुक्रमे 23 आणि 29 एप्रिल मतदान होणार आहे. या सर्व विधानसभा निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी होणार आहे. विशेष म्हणजे 5 राज्याच्या निवडणुकासोबत देशभरातील विविध राज्यांच्या निवडणुकासोबत महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकांचीही तारीख जाहीर करण्यात आलीय 8 विधानसभा क्षेत्रासाठी पोट निवडणूक 2 टप्यात 9 एप्रिल व 23 एप्रिलला होईल तर मतमोजणी 4 मे रोजी पार पडेल. गत 2021 मध्ये या राज्यांमधील निवडणुकांची घोषणा 26 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्यावेळी, प. बंगालमध्ये 8 टप्प्यांत निवडणुका झाल्या, आसाममध्ये 3 टप्पे तर तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले होते. देशाच्या 5 राज्यातील मतदारांची संख्या एकूण 17.4 कोटी एवढी आहे, तर 824 एकूण विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी एकूण मतदान केंद्रांची संख्या 2.19 लाख असून एकूण कर्मचारी 25 लाख कार्यरत आहेत, अशी माहितीही आयोगाने दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)