बल्लारपूर शहरातील वाढते अतिक्रमण व व महसूल नुकसानीच्या चौकशीसाठी १७ मार्चपासून राहुल गायकवाड यांच्या अन्नत्याग आंदोलन (Rahul Gaikwad begins a hunger strike on March 17 to demand an inquiry into rising encroachments and revenue losses in Ballarpur city.)
बल्लारपूर :- शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या विरोधात तसेच शासनाच्या महसुल ला झालेल्या मोठ्या नुकसानीची चौकशी व्हावी या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड यांनी १७ मार्चपासून अन्नत्याग आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी बल्लारपूर शहरातील स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सदर आंदोलन १७ मार्च रोजी दुपारी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर सुरू होणार आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (शिंदे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करून ते हटविणे, शहरातील ३१ बट्टे जमीन प्रकरणात बिल्डरांनी केलेल्या अतिक्रमणामुळे महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याची सखोल चौकशी सीआयडीमार्फत करणे, तसेच विसापूरजवळील ६९ बट्टे जमीन प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार थांबवावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. पत्रकार रमेश निषाद यांना जीवे मारण्याची धमकी देत अश्लील शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात लावलेली आयपीसी कलमे रद्द करून पत्रकार सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच शहरातून जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लावावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. वरील मागण्यांवर शासनाने तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा राहुल गायकवाड यांनी दिला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या