Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

राजुरा शहरात कारमधून धारदार लोखंडी तलवारी सह एक आरोपी अटकेत (An accused was arrested with sharp iron swords from a car in Rajura city.)

राजुरा शहरात कारमधून धारदार लोखंडी तलवारी सह एक आरोपी अटकेत (An accused was arrested with sharp iron swords from a car in Rajura city.)

राजुरा :- राजुरा शहरातील पंचायत समिती चौक परिसरात आज पहाटेच्या सुमारास राजुरा पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एका युवकाच्या कारमधून धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी अशा घातक शस्त्रासह फिरत असल्याने परिसरात खळबळ उडाली असून आरोपी रितेश यशवंत सोनवणे रा. साईबाबा वॉर्ड बल्लारपूर याला अटक केले आहे. आज, २५ फेब्रुवारी रोजी पहाटे राजुरा पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार शहरात गस्त घालत असताना पंचायत समिती चौकात उभी असलेल्या निळ्या रंगाच्या फियाट कारमध्ये एक इसम बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगून असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. वाहन क्रमांक एमएच १२ एफके ८८८२ या कारची झडती घेतली असता, मागील डिक्कीत एक जुनी परंतु धारदार लोखंडी तलवार आढळून आली. पोलीसांनी आरोपी ला ताब्यात घेऊन कार व तलवार असा एकूण ४ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. आरोपीविरुद्ध आर्म ॲक्ट १९५९ च्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई राजुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुमित परतेकी यांचा नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक ठाकरे, पोहवा विक्की निर्वाण, पुंडलिक परचाके, पोअं जितेंद्र हेपट यांनी केले. आरोपीकडून शस्त्र बाळगण्यामागील उद्देश काय होता, याचा सखोल तपास सुरू आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या