गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा पुण्यात दिमाखात संपन्न (A reunion ceremony of alumni of Guru Nanak Science College was held in Pune.)

Vidyanshnewslive
By -
0
गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा पुण्यात दिमाखात संपन्न (A reunion ceremony of alumni of Guru Nanak Science College was held in Pune.)

70 हून अधिक माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती, जुन्या आठवणींना उजाळा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा

चंद्रपूर : गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा पुणे येथील सिंहगड ब्रीझ रिसॉर्ट येथे अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. 1980 ते 2019 या कालावधीत महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेले सुमारे 70 हून अधिक माजी विद्यार्थी या सोहळ्यासाठी एकत्र आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन गुरुनानक कॉलेज ग्लोबल फाऊंडेशन, बल्लारपूर (माजी विद्यार्थी संघटना) यांच्या वतीने करण्यात आले होते. या स्नेहमिलनाच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर मित्रमैत्रिणी पुन्हा एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय वाढई यांनी केली. कार्यक्रमात डॉ. देवेंद्र लींगोजवार आणि कार्तिक वागदेव यांनी गुरुनानक महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीचा आढावा सादरीकरणाच्या माध्यमातून मांडला. तसेच सध्या गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपुर येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत मार्गदर्शनही करण्यात आले. या प्रसंगी विशेष पाहुणे म्हणून माजी विधार्थी, डीपर पुणे चे अध्यक्ष श्री. हरीश बूटले उपस्थित होते. कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी विद्यार्थी प्रणय विगनेश्वर (बल्लारपूर) यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह निर्माण केला. कार्यक्रमात उपाध्यक्ष वीरेंद्र आर्य आणि वाणी रामजी यांनी आपले मनोगत व्यक्त करून माजी विद्यार्थ्यांनी संस्थेशी आपले नाते कायम जपावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव नरेश मुंदडा यांनी प्रभावीपणे केले. स्नेहमिलनानंतर दुसऱ्या दिवशी पुणे येथील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीला माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूणच हा स्नेहमिलन सोहळा माजी विद्यार्थ्यांमधील स्नेह, एकोपा आणि संस्थेबद्दलची आपुलकी अधिक दृढ करणारा ठरला, असे उपस्थितांनी सांगितले. गुरुनानक कॉलेज ग्लोबल फाउंडेशन, बल्लारपूरचे अध्यक्ष डॉ. विजय वाढई, उपाध्यक्ष वीरेंद्र आर्य, सचिव नरेश मुंदडा, डॉ. अजय पंचभाई, डॉ. देवेंद्र लींगोजवार, कार्तिक वागदेव, वाणी रामजी, प्रमोद चिंचूवार, अखिलेश पाटील, विजय सिंगाडी, डॉ. अंजली सालवे, प्रणय विगनेश्वर, डॉ. शीतल जांभुळे, पंकज जोग, समीर देशपांडे, आदी सदस्यांनी विशेष सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमाला गुरु नानक कॉलेज, बल्लारपूरचे प्राचार्य डॉ. भास्कर बहिरवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. अशी माहिती संस्थेचे सहसचिव जितेंद्र जोगड यांनी दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)