Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूर पोलिसांची कारवाई, सहा दुचाकीं व चार मोबाईलसह सराईत वाहनचोरास अटक (Ballarpur police action: Habitual vehicle thief arrested; six two-wheelers and four mobile phones seized.)

बल्लारपूर पोलिसांची कारवाई, सहा दुचाकीं व चार मोबाईलसह सराईत वाहनचोरास अटक (Ballarpur police action: Habitual vehicle thief arrested; six two-wheelers and four mobile phones seized.)

बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत यशस्वी छडा लावत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेल्या सहा दुचाकी, चार मोबाईल फोन आणि एक मोपेड असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. बच्चीलाल उर्फ सूरज धंजू शाक्यवार (वय ४४), मूळ रा. इटोंदा, जिल्हा दतिया (मध्यप्रदेश) व सध्या संतोषी माता वॉर्ड, बल्लारपूर असे आरोपीचे नाव आहे. मौलाना आझाद वॉर्ड, बल्लारपूर येथील हर्षद रमेश घोटेकर (वय २८) यांनी २८ जून २०२६ रोजी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी २५ जून रोजी दुपारी रेल्वे स्टेशनसमोरील पार्किंगमध्ये आपली हिरो स्प्लेंडर क्रं. एमएच-३४-बीसी-०५०१ दुचाकी उभी करून जेवणाचे पार्सल देण्यासाठी रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केला होता. पार्सलचे वितरण करून परत आल्यानंतर दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही वाहनाचा मागमूस लागला नाही. त्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. 
          दरम्यान, दुसऱ्या एका गुन्ह्यात ताब्यात असलेला आरोपी बच्चीलाल ऊर्फ सूरज धंजू शाक्यवार (वय ४४), मूळ रा. इटोंदा, जिल्हा दतिया (मध्यप्रदेश) व सध्या संतोषी माता वॉर्ड, बल्लारपूर याची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या कसून तपासात आरोपीने संबंधित दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याने चोरीस गेलेली हिरो स्प्लेंडर दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केली. चौकशी अधिक सखोल केल्यानंतर आरोपीने आणखी पाच चोरीच्या दुचाकी लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी नंबर प्लेट नसलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस, हिरो होंडा सीडी डिलक्स क्रं एमएच ३४ जी ९६८९ हिरो सुपर स्प्लेंडर, एमएच ४९ बीएच ३७४३, नंबर प्लेट नसलेली हिरो फॅशन प्लस तसेच हिरो होंडा स्प्लेंडर क्रं. एमएच ३४ एच ३८४८ या दुचाकी जप्त केल्या. या सर्व वाहनांची एकूण किंमत सुमारे १ लाख ५५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय, याच आरोपीकडून यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या एव्हिएटर मोपेड क्रं. एमएच ३४ बीए ४५६४ ची तपासणी केली असता तिच्या पेट्रोल टँक कव्हरमध्ये चोरीचे चार मोबाईल फोन लपवून ठेवलेले आढळून आले. यात ओप्पो, रेडमी आणि पोको कंपनीच्या मोबाईलचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे १५ हजार रुपये आहे. 
           या कारवाईत चोरीच्या सहा दुचाकी, चार मोबाईल फोन आणि एव्हिएटर मोपेड असा मिळून २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडून आणखी काही वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने बल्लारपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोहवा पुरुषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, संतोष पंडित, लालू यादव, पंकज शिंदे, नापोअं सचिन अल्लेवार, पोअं शरदचंद्र कारूष, महेश कुकूडकर, खंडेराव माने, लखन चव्हाण, वैभव गाडगे, मपोअं अनिता नायडू यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या