Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

रास्त भाव दुकानांकरीता 31 जुलै पर्यंत अर्ज आमंत्रित (Applications invited for fair price shops until July 31.)

रास्त भाव दुकानांकरीता 31 जुलै पर्यंत अर्ज आमंत्रित (Applications invited for fair price shops until July 31.)

चंद्रपूर -: जिल्हयातील चंद्रपूर, बल्लारपुर, राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, मुल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, चिमुर, वरोरा व भद्रावती या 14 तालुक्याअंतर्गत गावे / वार्डाकरिता एकूण 119 नवीन रास्त भाव दुकानाचे परवाने मंजुरीसाठी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर गावातील / क्षेत्रातील इच्छुक पंचायत (ग्राम पंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था) / नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट / नोंदणीकृत सहकारी संस्था / महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था / महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांच्याकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तहसिलदार यांचे कार्यालयात 31 जुलै 2026 पर्यंत शासकीय कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) उपलब्ध होतील. जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आलेल्या गावाचे / वार्डांची नाव, तालुक्यांतील जाहिरनाम्यांची संख्या, अर्ज करण्याच्या अटी व शर्ती इत्यादी सर्व माहिती संबंधित तहसिलदार, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग चंद्रपूर, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर, संबंधित नगरपालिका / महानगरपालिका / ग्रामपंचायतीचे नोटीस बोर्डवर तसेच www.chanda.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. बहादुरकर यांनी कळविले आहे.

 संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या