राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी व्यासपीठ - कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे (National Service Scheme is an effective platform for the holistic development of students – Vice-Chancellor Dr. Prashant Bokare)
चंद्रपूर :- राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, शिस्त, सामाजिक उत्तरदायित्व, राष्ट्रप्रेम आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविणारे प्रभावी व्यासपीठ आहे. या माध्यमातून वृक्षारोपण, जलसंवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण यांसारखे उपक्रम सातत्याने राबवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवता येते, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले. कुलगुरू डॉ. बोकारे यांनी चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्तीच्या दिशेने राष्ट्रीय सेवा योजना विभागाने व्यापक जनजागृती अभियान राबवावे, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी NSS ही केवळ उपक्रमांची योजना नसून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि सेवाभाव निर्माण करणारी चळवळ असल्याचे सांगितले.
तसेच विद्यापीठात स्वतंत्र NSS 'ओपन युनिट' सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. पहिल्या सत्रात संजय रामगिरवार यांनी 'चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मोहीम आणि वृक्षारोपण' या विषयावर मार्गदर्शन करताना एनएसएस स्वयंसेवकांची पर्यावरण संवर्धनातील भूमिका स्पष्ट केली. दुसऱ्या सत्रात डॉ. श्याम खंडारे, डॉ. गुरुदास बल्की आणि डॉ. प्रदीप चापले यांनी अनुदान वितरण, लेखापरीक्षण, स्वयंसेवक नोंदणी, विशेष शिबिरे, तसेच विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. आगामी शैक्षणिक वर्षातील उपक्रम, पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन आणि विद्यार्थी विकास यावरही सविस्तर चर्चा झाली. कार्यशाळेचे प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हा समन्वयक डॉ. गुरुदास बल्की यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या