Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूरात महापरीनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या अनुयायांनी केले अभिवादन...! (Babasaheb's followers paid their respects on the occasion of Mahaparinirvana Day in Ballarpur...!)

बल्लारपूरात महापरीनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या अनुयायांनी केले अभिवादन...! (Babasaheb's followers paid their respects on the occasion of Mahaparinirvana Day in Ballarpur...!)

" भिमराया घे तुझ्या या लेकराची वंदना...! " गीतांनी दुमदूमला स्मारक परिसर

बल्लारपूर :- भिमराया घे तुझ्या या लेकराची वंदना...! या गीताचे स्वर मुखी वंदून ६ डिसेंबर 2025 ला महापरीनिर्वाण दिनी या वेदनादायी स्मृती मनामनात उजाळत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी शहरात आंबेडकरी अनुयायांचा जनसागर उसळला. मुंबईतील चैत्यभूमीवरील त्या ऐतिहासिक अंत्यसंस्कारांची आठवण आजही ताजी असून, महामानवाच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी बल्लारपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात हजारो अनुयायी पहाटेपासूनच दाखल होत होते. पांढरी शुभ्र वस्त्रे, हातात मेणबत्त्या आणि पुष्पगुच्छ अशा भाविकांच्या लोंढ्याने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. बुद्धम् शरणम् गच्छामी च्या घोषणांसह भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी अशी आर्त हाक देत नागरिकांनी पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन आदरांजली वाहिली. बल्लारपूर शहरातील वस्ती, टेकडी आणि डेपो विभागातून मेणबत्ती रॅली काढण्यात आल्या. महिलांपासून युवकांपर्यंत तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. दिवसभर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणाऱ्यांची वर्दळ कायम होती. महामानवाच्या विचारातील मानवता, सामाजिक समतेचा संदेश आणि अन्यायाविरोधातील लढ्याची प्रेरणा या गर्दीतून प्रकर्षाने जाणवत होती. जय भीम च्या घोषणांनी शहराचे वातावरण दुमदुमून गेले होते.
             दरम्यान, शहरातील विविध सामाजिक संघटना, महिला मंडळे, युवक गट, राजकीय पक्ष, तसेच नगर परिषद, पोलीस स्टेशन आणि विविध विभागातील अधिकारी - कर्मचारी यांनीही उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. यासोतच विविध राजकीय पक्षाच्या वतीने सर्वांनी शिस्तबद्ध आणि शांततेत अभिवादन कार्यक्रम पार पाडला. यासोबतच बल्लारपूर शहरातील अनेक बौध्द विहारे (लुबिनी बुध्द विहार, सम्राट अशोक बुध्द विहार, महाप्रज्ञा बुध्द विहार, असित बुध्द विहार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय, त्रिशरण बुध्द विहार, तथागत बुध्द विहार, पाली विद्यालय बल्लारपूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, वैशाली बुध्द विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सांची बुध्द विहार, आंबेडकर वाचनालय कॉलरी परिसर, सिद्धार्थ बुध्द विहार, आम्रपाली बुध्द विहार(सिद्धार्थ नगर), विश्वशांती चौक(संतोषी माता वॉर्ड), आम्रपाली बुध्द विहार(सातखोली) ई सह अनेक बुध्द विहार व विविध सामाजिक संघटनाच्या वतीने रात्री उशिरापर्यंतही अनुयायी पुतळ्याला अभिवादन करत राहिले. दिवसभर चाललेल्या या भाविकांच्या ओघामुळे संपूर्ण परिसर जयभीमच्या घोषणांनी आणि दीपप्रज्वलनाने उजळून निघाला होता. यावेळी नगर प्रशासन व पोलीस प्रशासनाचे उत्तम सहकार्य लाभले 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या