जागतिक एड्स सप्ताह निमित्त महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाने विविध उपक्रमांचे आयोजन (Mahatma Jyotiba Phule College organizes various activities on the occasion of World AIDS Week)
बल्लारपूर :- बल्लारपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या नॅशनल कॅडेट कॉर्प विभाग आणि रेड रिबन क्लबच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली, एड्स जागरूकता मोहीम आणि कॅडेट्स ला मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक एड्स दिनानिमित्त कॅडेट्स आणि महाविद्यालयिन विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सतीश कर्णासे, मार्गदर्शक श्री. सचिन तल्लार समुपदेशक आणि श्रीमती स्मिता काकडे आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर तसेच श्रुती तल्लार संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्था चंद्रपूर उपस्थित होते. जागतिक एड्स दिनानिमित्त लेफ्टनंट योगेश टेकाडे असोसिएट एनसीसी अधिकारी विद्यार्थ्यांना शपथ दिली.
त्यानंतर, प्रत्येक घरात जागतिक एड्स दिन निमित्ताने जागरूकता मोहीम आयोजित करण्यात आली. प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक श्री. सचिन तल्लार यांनी विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य एच आई व्ही पासून कसे सुरक्षित ठेवावे या साठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. कर्णासे यांनी एच आई व्ही ची जनजागृती चे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमा मध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि एनसीसी कॅडेट्स आणि मोठ्या संख्येत विद्यार्थी सहभागी झाले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट कोमल महेशकर यांनी केले आणि आभार लान्स कार्पोरल रागिणी टेकाम हिने मानले. या दोन्ही कार्यक्रमाना महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


0 टिप्पण्या