गडचिरोली :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते माल्यार्पण व पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अधिसभा सदस्य डॉ. नरेश मडावी, सतिश पडोळे, ज्ञान स्त्रोत केंद्राच्या समन्वयक डॉ. रजनी वाढई, उपकुलसचिव डॉ. कामाजी देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे सहसमन्वयक सहा. प्रा. रोहित बापू कांबळे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. 8 रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ. रविंद्र कांबळे यांचे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक क्रांती" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून सदर व्याख्यानास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. श्रीराम कावळे यांनी अभिवादानंतर केले. याप्रसंगी डॉ. नंदकिशोर मने, डॉ. अनिरुध्द गचके, डॉ. देवदत्त तारे, डॉ. अपर्णा भाके, डॉ. प्रमोद जावरे, डॉ. अनंता गावंडे, डॉ. सरफराज अन्सारी, मनोज जाधव यांच्यासह अन्य प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या