बल्लारपूर मतदार संघात तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार? मतदारात उत्सुकता (Who will win the triple fight in Ballarpur constituency? Curiosity among voters)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर मतदार संघात तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार? मतदारात उत्सुकता (Who will win the triple fight in Ballarpur constituency? Curiosity among voters)


बल्लारपूर :- बल्हारपूर मतदार संघाची निवडणूक रंगतदार होत आहे. तिहेरी लढतीमुळे महायुतीचे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा विजय निश्चित झाला आहे. लोकसभेत सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना तब्बल 45 हजार मतांचा फटका बसल्यांने, या निवडणूकीत कॉंग्रेसचे पारडे जड जाईल. कॉंग्रेस -भाजपा व अपक्ष उमेदवार यांच्यात तुल्यबळ लढत होईल असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आता फोल ठरीत आहे. सुधीर मुनगंटीवार हे या मतदार संघातून चौथ्यांदा विजयी होणार याबद्दल आता कुणीही शंका घेत नाही. कॉंग्रेस आघाडीकडून मूलचे व्यवसायाने कंत्राटदार असलेले मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत आणि महायुतीकडून विद्यमान आमदार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार रिंगणात आहेत. दोनही उमेदवारांची राजकीय सुरूवात भाजपातूनच झाली. मुनगंटीवार हे भाजपातच आहेत, मात्र संतोष रावत यांचा तत्कालीन मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांचेसोबत वाद झाल्यांने ते कॉंग्रेसवासी झालेत. एकाच पक्षात वाढलेले हे दोनही नेत्यांचा पक्ष आणि त्यांची रासही एकच (सुधीर—संतोष) एकच आहेत. मात्र दोघांचे स्वभावात कमालीचे अंतर असल्यांचे मतदारात चर्चा आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा स्वभाग मृदभाषी आहे. ते सतत जनतेच्या संपर्कात येतात. कार्यकर्त्यासोबत 'माणूसकी'ने आणि आपुलकीने बोलतात. कितीही मोठ्या पदावर, कोणत्याही बैठकीत असले तरी, सामान्य नागरीकांचे, अगदी मतदार संघाचे बाहेरच्या नागरीकांचेही आपुलकीचे फोन घेतात. व्यस्त असले तरी, कॉल बॅक करतात. आपुलकीने समस्या विचारतात. सन्मानाने नांव घेवून बोलतात. घाई न करता पूर्ण ऐकूण घेतात आणि समोरच्याचे समाधान होईलपर्यंत पाठपुरावा करतात. कुठेही चिडचिड नाही, त्रागा नाही, मागील अनेक वर्षापासून ते मोबाईल नंबर देखिल एकच वापरतात. मतदार संघातील प्रत्येकांच्या मोबाईल मध्ये त्यांचा नंबर सेव दिसतो. त्यांचे चंद्रपूरचे असो कि मुंबईचे कार्यालय सतत लोकांनी भरलेले असतात, रात्रौ 2-2 वाजेपर्यंत ते चेहर्यावर स्मित ठेवून, जणूकाही पहिल्यांच व्यक्तींशी वार्तालाप करीत आहेत अशा उर्जेने ते संवाद करतात. अगदी विमानतळावरही लोकांच्या गराड्यात निवेदनावर निर्णय घेवून, संबधितांना फोनवर सुचना देवून जनकल्याणाचे कामे करतात. ऐवढे सारे ते कसे करतात? ऐवढी क्षमता, ऐवढी उर्जा त्यांचेत कुठून येते? कितीही प्रश्न असले, कितीही तणाव असला तरी, चेहर्यावर कायम स्मित कसे असते, त्यांचेत सहनशक्ती कुठून येते? हे सारे दैववत वाटते मात्र हे सारे खरे आहे हे कुणीही नाकारणार नाही. या उलट कॉंग्रेस उमेदवार संतोष रावत यांचे आहे. ते मुळात कंत्राटदार असल्यांने, त्यांची भाषाही तशीच झाली आहे. कुणावरही ओरडणे, शिवी घालणे, उपकाराची सतत जाणीव करून देणे, धमकी देणे, फोन उचलतीलच याची खात्री नाही. कॉल बॅक करतील याची खात्री नाही. यामुळेच त्यांचे अनेक कार्यकर्ते त्यांचेपासून तुटले आहेत. भेजगांवचे कॉंग्रेसचे नेते अखिल गांगरेड्डीवार यांचे एका छोट्या चुकीवरून, त्यांना बडे बोल सुनावले, यामुळेच अखिल गांगरेड्डीवार भाजपवासी झालेत. संतोष रावत हे स्वत:च्या जीभेवर नियंत्रण ठेवू शकत नसल्यांचा मोठा फटका त्यांना अखिलच्या रूपाने मिळाला. असे अनेक 'अखिल' त्यांनी आजवर तयार केलेत. संतोष रावत यांची बोलण्यांची भाषा बरोबर नाही हे त्यांचे निकटवर्तीय देखिल कबुल करतात, मात्र भाऊचे मन खुप चांगले आहे याची पुष्टीही करतात. दोन स्वभावाचे दोन नेते बल्हारपुरच्या रिंगणात असून, यातील कोणाचा स्वभाग मतदारांना भावते, हे येणारी निवडणूकच ठरविणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)