कांग्रेस उमेदवार संतोससिंग रावत यांचा उमेदवारी अर्ज खारीज करा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेत नियमबाह्य भरती घेऊन व आचार अहिंतेचे उल्लंघन केल्याने मनसेची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार. (Reject the candidature of Congress candidate Santos Singh Rawat, MNS complains to the election authorities for illegal recruitment in District Central Cooperative Bank and violation of ethics.)

Vidyanshnewslive
By -
0
कांग्रेस उमेदवार संतोससिंग रावत यांचा उमेदवारी अर्ज खारीज करा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेत नियमबाह्य भरती घेऊन व आचार अहिंतेचे उल्लंघन केल्याने मनसेची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार. (Reject the candidature of Congress candidate Santos Singh Rawat, MNS complains to the election authorities for illegal recruitment in District Central Cooperative Bank and violation of ethics.)
चंद्रपूर :- कांग्रेसचे बल्लारपूर विधानसभा उमेदवार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांनी जिल्ह्यातील एससी, एसटी व ओबीसी चे आरक्षण संपवून बैंकेत जिल्ह्यातील हजारो मागासवर्गीय तरुण उच्चशिक्षित बेरोजगार यांच्यावर अन्याय केल्याने व नोकर भरती दरम्यान त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी घेतलेल्या चुकीच्या व नियमबाह्य निर्णयामुळे त्यांनी आचारसहिंतेचे उल्लंघन केले आहे त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज खारीज करा अशी मागणी मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांच्या माध्यमातून बैंकेत 360 पदाची जी सरळ सेवा भरती निवडणूक काळात होत आहे, ती भरती प्रक्रिया अगोदरचं विवादात सापडली आहे, कारण भरती करिता विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची मुद्दत 19 ऑक्टोबर 2024 ला होती व आचारसहिंता ही 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरु आहे, दरम्यान आचारसहिंता सुरु असताना बैंकेचे अध्यक्ष तथा कांग्रेस चे बल्लारपूर विधानसभा उमेदवार संतोषसिंग रावत यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या पद भरतीची फॉर्म भरण्याची मुद्दत ही 19 ऑक्टोबर ऐवजी 22 ऑक्टोबर ला रात्री 12 वाजेपर्यंत वाढवली व फॉर्ममधील चुकांची दुरुस्ती आणि फी पेमेंट करिता 23 ते 25 ऑक्टोबर पर्यंत मर्यादा ठेवली, दरम्यान अगोदर च्या जाहिरात मध्ये पात्रता ही कुठल्याही शाखेचा पदवीधर असे नमूद होते, मात्र नंतरच्या दिनांक 19 ते 22 ऑक्टोबर पर्यंत जी दुसरी जाहिरात केली त्यात पहिली अट ही कुठल्याही शखेचा द्वितीय श्रेणीत पास झालेला पदवीधर असे नमूद केले, जेंव्हा की निवडणूक आचारसहिंतेत तारीख आणि जाहिरात बदलणे म्हणजे आदर्श आचारसहिंतेचा भंग आहे जो बैंकेचे अध्यक्ष व विधानसभेचे कांग्रेस उमेदवार संतोससिंग रावत यांनी केला आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे अध्यक्ष तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार यांनी वरील बाबतीतचं आचारसहिंतेचे उल्लंघन केले नाही तर त्यांनी पत्र क्रमांक / कर्ज वसुली यंत्रणा / सानुग्रह अनुदान / 2878/2024-25 या पत्रान्वये दि.30.10.2024 ला आदेश काढून जिल्ह्यातील सर्व गटसचिव व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे व्यवस्थापक व कार्यालयीन नियमीत, कंत्राटी कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान दिले आदर्श आचारसहिंतेचा उल्लंघन आहे, पत्रात खाली नमूद आहे की "अध्यक्ष यांच्या आदेशान्वये" याचा अर्थ अध्यक्ष संतोषसिंग रावत यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 30/10/2024 ला जो आदेश दिला व जिल्ह्यातील सर्व गटसचिव व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे व्यवस्थापक व कार्यालयीन नियमीत, कंत्राटी कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देऊन आर्थिक लाभ दिला जो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी निगडित आहे व त्यामुळे कांग्रेस उमेदवार संतोससिंग रावत यांच्या बाजूने मतदारांचे मतं परावर्तीत होण्याची शक्यता असल्याने यामुळे आदर्श आचारसहिंतेचा भंग होत आहे. त्यामुळे योग्य ती चौकशी करून संतोससिंग रावत यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा अश्या मागणीची तक्रार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)