चंद्रपूर :- आमदार किशोर जोरगेवार शेकडो कार्यकर्त्यांसह पदयात्रेतून मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचे आज दिसून आले. बंगाली कॅम्प परिसर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात त्यांनी पदयात्रा काढत नागरिकांच्या भेटीगाठी घेत पाच वर्षांतील कामांचा आढावा दिला. यावेळी कार्यकर्त्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रचाराचा वेग वाढला आहे. यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मात्र, आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून आपली कामे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपासून सकाळी पदयात्रा आणि संध्याकाळी छोटेखानी बैठका असा नियमित प्रचार कार्यक्रम आमदार किशोर जोरगेवार यांनी आखला असून यातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे या प्रचारादरम्यान ते मागील पाच वर्षांत केलेली कामे आणि पुढे चंद्रपूरच्या विकासाचे व्हिजन लोकांना पटवून देताना दिसून येत आहेत. त्यांच्या या प्रचाराला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही ते आपुलकीने भेटत असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध केलेल्या सोयीसुविधांबाबत त्यांना माहिती देत आहेत. प्रचारादरम्यान बोलताना ते म्हणाले की, मागील पाच वर्षांत आपण चंद्रपूरात विकासकार्य केले आहे. नागरिकांचे आलेले प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा आपला प्रयत्न राहिला आहे. आपण कार्यालयात कर्तव्य सेतु केंद्र सुरू केले असून या केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, विधवा, परित्यक्ता यांचे शासकीय योजनांची कागदपत्रे निशुल्क काढून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मागील पाच वर्षांत आपण सतत नागरिकांच्या संपर्कात राहिलो असून, याचा फायदा प्रचारादरम्यान मिळत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या घुग्घुस येथे. बसस्थानक जवळील लॉयड मेटल परिसरात जाहीर सभेचे आयोजन महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय परिवहन मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी हे उद्या, बुधवारी चंद्रपूरात असणार असून, दुपारी दीड वाजता घुग्घुस येथील बसस्थानकाजवळील लॉयड मेटल परिसरात त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ भाजपचे स्टार प्रचारक चंद्रपूरात येत असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची उद्या बुधवारी घुग्घुस येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. घुग्घुस येथील बसस्थानक जवळील लॉयड मेटल परिसरात सदर सभा पार पडणार असून, ग्रामीण भागासह घुग्घुस परिसरातील नागरिकांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments